दरम्यान, या घटनेचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत. काल शवविच्छेदन झाल्यानंतरसकाळी डॉक्टर गौरी पालवे यांचं पार्थिव पाथर्डी तालुक्यातील मोहोळ देवडे गावात दाखल झालं. मुलीचं पार्थिव मूळ गावी येताच नातेवाईकांकडून एकच आक्रोश करण्यात आला. अंत्यसंस्काराला हजारो ग्रामस्थ उपस्थित आहेत.
सुरुवातीला गावातील स्मशानभूमीतच गौरीवर अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं होतं. मात्र ऐनवेळी नातेवाईकांकडून अंत्यविधीची जागा बदलण्यात आली आहे. आरोपी पती अनंत गर्जे याच्या राहत्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला आहे. यामुळे गर्जे आणि पालवे कुटुंबामध्ये वादावादी झाली आबे. यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
advertisement
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी गर्दी पांगवण्याचा आणि नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र गौरीचे वडीलांनी व्हिडीओ कॉलवर आरोपीला अटक केलेली दाखवा, अशी मागणी केली आहे. तसेच अनंत गर्जेच्या दारासमोर गौरीच्या मृत देहावर अंत्यसंस्कार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. काही नातेवाईकांनी गर्जेच्या घरासमोर लाकडं टाकून सरण देखील रचलं. त्यामुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाथर्डीचे पोलीस अधिकारी नातेवाईकाची चर्चा करत आहेत.
