डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी आत्महत्या केली होती. त्या अगोदर डॉक्टरांना एका महिला कर्मचाऱ्याने तीन कॉल केले असल्याची अधिकृत माहिती मनीषा मुसळेचे वकील अॅड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. नवगिरे यांनी दिलेल्या तपशीलामुळे आता वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
advertisement
मनीषा मुसळेच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला
अॅड. प्रशांत नवगिरे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले, की डॉ वळसंगकर यांना आत्महत्येपूर्वी 16 आणि 17 एप्रिलला पी राऊत यांचे कॉल आले होते. पी राऊत या डॉ वळसंगकर आत्महत्या प्रकरणात साक्षीदार असून वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचारी आहेत. डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीत डॉ वळसंगकर, पी राऊत आणि आर राऊत यांचे सीडीआर तपासा, त्यांचं टॉवर लोकेशन तपासा, अशी मागणी देखील वकिलांनी कोर्टाकडे केली आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या दोन दिवस आधी त्यांना एका विशिष्ट क्रमांकावरुन कॉल आला होता. या काळात वळसंगकर यांना अनेक कॉल येऊन गेले. यातील प्रत्येक कॉल हा १ ते २ मिनिटांचा होता. मात्र संबंधित क्रमांकावरून आलेल्या कॉलवर वळसंगकर किमान २ मिनिटं ते १२ मिनिटांपर्यंत बोलले आहेत. आत्महत्येच्या आदल्या दिवशीही म्हणजेच 17 एप्रिल रोजी राऊत यांनी वळसंगकरांना तीन कॉल केले होते. यात 23 मिनिटं, ४ मिनिटं आणि 67 सेकंद संवाद साधला होता.
आत्महत्येच्या दिवशी तीन कॉल
एवढंच नव्हे तर आत्महत्येच्या काही मिनिटं आधी देखील पी राऊत नावाच्या महिलेनं वळसंगकरांना तीन कॉल केले होते. आत्महत्येच्या १२ मिनिटं आधी वळसंगकर आणि पी राऊत यांच्यात शेवटचा संवाद झाला होता. यानंतर अवघ्या १२ मिनिटांत वळसंगकरांनी आत्महत्या केली होती, अशी धक्कादायक माहिती मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी समोर आणली आहे.
राऊतशी बोलल्यानंतर १२ व्या मिनिटांत वळसंगकरांनी संपवलं जीवन
डॉ शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या ४३ मिनिटं आधी डॉ वळसंगकरांना राऊत आडनावाच्या महिलेनं 7 वाजून 57 मिनिटाला कॉल केला होता. दोघांत 5 सेकंद बोलणं झालं. 8 वाजून 25 मिनिटाला - पुन्हा 31 सेकंद बोलणं झालं, तर 8 वाजून 28 मिनिटाला 18 सेकंद डॉ शिरीष वळसंगकर आणि राऊत या महिलेसोबत संभाषण झालं आहे.
