TRENDING:

बंदूक जमा करा, अन्यथा डोक्यात गोळ्या घालून... नशेत पोलिसाची वरिष्ठांना धमकी

Last Updated:

गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका पोलीस जवानानं दारुच्या नशेत आपल्या वरिष्ठाला धमकी दिल्याचं समोर आलंय. बंदूक जमा करा, अन्यथा डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करेन, अशी धमकी मद्यपी पोलिसानं वरिष्ठांना दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, गोंदिया: गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका पोलीस जवानानं दारुच्या नशेत आपल्या वरिष्ठाला धमकी दिल्याचं समोर आलंय. बंदूक जमा करा, अन्यथा डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करेन, अशी धमकी मद्यपी पोलिसानं वरिष्ठांना दिली. ही घटना समोर येताच खळबळ उडाली आहे.
नशेत पोलिसाची वरिष्ठांना धमकी
नशेत पोलिसाची वरिष्ठांना धमकी
advertisement

गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी भारत बटालियनची टीम स्थापन केली होती. यामधील एका जवानाने मद्याच्या नशेत थेट वरिष्ठांना धमकी दिली. या जवानाविरुद्ध सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Pune News: बेघरांना मिळणार हक्काचं घर, 1867 घरकुलांना मंजुरी

सुरेश वामनराव साळी (वय 46) असं या जवानाचं नाव आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक-6 धुळे येथील बी. कंपनीच्या प्लाटून क्रमांक- 2 येथे तैनात पोलीस शिपाई सुरेश साळी यांना जिल्हांतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र पोलीस कॅम्प पिपरीया येथे पोस्ट सुरक्षा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं आहे. ड्युटीवर गैरहजर राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी वरिष्ठांनी त्याला खुलासा सादर करण्यास सांगितलं. मात्र, मला खुलासा का मागितला म्हणून सुरेश साळीचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात तो आपल्या हातातील बंदूक घेऊन पोलीस उपनिरीक्षक एकनाघ डक यांच्याकडे गेला. माझी रायफल जमा करा नाहीतर रायफलने मी स्वतःचा जीव घेईन, अशी धमकी त्यानं दिली. त्यावेळी तो मद्याच्या नशेत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक पूनमचद उत्तमसिंग सुलाने (वय 45) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 (1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बंदूक जमा करा, अन्यथा डोक्यात गोळ्या घालून... नशेत पोलिसाची वरिष्ठांना धमकी
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल