Pune News: बेघरांना मिळणार हक्काचं घर, 1867 घरकुलांना मंजुरी
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
पुण्यातील बेघर लोकांना लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे बेघर लोकांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे: राहण्याचे, खाण्याचे वांदे असलेले अनेक लोक आपल्याला सरकारी घरं मिळतील या आशेवर आहेत. बेघर लोक आपल्याला घर मिळणार याच अपेक्षेवर कित्येक दिवस काढत आहेत. अशातच आता पुण्यातील बेघर लोकांना लवकरच घर मिळणार आहे. त्यामुळे बेघर लोकांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
बेघरांना आता मिळणार हक्काचे घर. पुणे जिल्ह्यातील बेघरांसाठी 1867 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. घरकुलासाठी पात्र असलेल्या पुणे जिल्ह्यातील 1 हजार 867 बेघरांना आता जिल्हा परिषदेने घरकुल मंजूर केलेत.
ही घरकुले मोदी आवास घरकुल योजना आणि रमाई आवास घरकुल योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर करण्यात आलेल्या एकूण घरकुलांमध्ये मोदी आवास योजनेतील 865 आणि रमाई आवास घरकुल योजनेतील 1 हजार दोन घरकुलांचा समावेश आहे. या दोन्ही मंजूर झालेल्या घरकुल योजनेतील घरांचे बांधकाम त्वरित सुरु करण्याचा आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.
advertisement
दरम्यान, मोदी आवास घरकुल योजनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मागास प्रवर्गातील बेघरांना तर, रमाई आवास योजनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातील बेघरांना घरकुल मंजूर केले जाते. त्यामुळे आता लवकरच पुण्यातील बेघरांची चिंता संपेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2024 9:51 AM IST









