गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही, त्या ग्राहकांनी त्वरित करून घ्यावी. अन्यथा सिलिंडर मिळवण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एजन्सीच्या अधिकृत गाडीद्वारे ई-केवायसी करण्याची सोय करण्यात आली आहे. ग्राहकांना म्हसवड येथील मुख्य कार्यालयात येणे बंधनकारक राहणार नाही.
ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्ड, गॅस पुस्तक, स्वतः व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. ग्राहकांनी तातडीने सहकार्य करून ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन शुभम भारत गॅस एजन्सी, म्हसवडतर्फे करण्यात आला आहे.
advertisement
हे ही वाचा : Pune Traffic Update : पुण्याची वाहतूक कोंडी कायमची सुटणार! गडकरींकडून 6 हजार कोटी रु मंजूर, कसा असणार मेगाप्लॅन?
हे ही वाचा : कोल्हापुरात फुललं 'कास पठारा'सारखं सौंदर्य; 'या' सोनेरी-पिवळ्या फुलांनी पर्यटकांचं वेधलं लक्ष!
