एकनाथ खडसे हे महसूलमंत्री असताना भोसरी औद्योगीक वसाहतीमधील एक भूखंड हा नियमांचे उल्लंघन करून त्यांची पत्नी आणि जावई यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. या प्रकरणी खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टात सुरु आहे. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली केली होती. ही जमीन मूळ बाजारभावाच्या अगदी कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप आहे.
advertisement
13 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एमपीएमएलए न्यायालय हे 16 जानेवार काही कारणानं उपलब्ध नसल्यामुळं या प्रकरणाची सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार होती. 3 डिसेंबर 2025 रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयानं भोसरी येथील जमीन विक्रीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त करण्यास नकार दिला होता. त्यानंतर विशेष न्यायालयात आज आरोप निश्चित होणार होते. सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने आरोप निश्चितीचा मार्ग मोकळा झाला आहे १३ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी होणार आहे.
