मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी पवारांना अभिष्टचिंतन करताना त्यांच्या दीर्घ राजकीय योगदानाचा विशेष उल्लेख केला. वेळी शिंदे यांनी त्यांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य मिळावे आणि तुमचे मार्गदर्शन आम्हाला सतत लाभावे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पवारांविषयी आदर व्यक्त केला. यावेळी त्यांनी पवारांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावे, असे शुभेच्छा देत “आपण वयाची सेंच्युरी गाठावी,” अशी मनापासूनची सदिच्छाही व्यक्त केली.
advertisement
महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात शरद पवार मागील ५० हून अधिक वर्ष कार्यरत आहेत. राज्याचे तरुण मुख्यमंत्री ते केंद्रीय संरक्षण, कृषी मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शरद पवार यांचे राजकारणाशिवाय, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान राहिले आहे. क्रीडा संघटनांमध्येही शरद पवार यांचा वावर राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आदी जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
शरद पवारांचे वयाच्या ८५व्या वर्षातही कायम सक्रिय असणे हे राजकीय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाने आणि अनुभवाने अनेक पिढ्या घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी राज्यातील सर्व राजकीय पक्षांमधून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
