एकनाथ शिंदे यांची डेंग्यू आणि मलेरीयाची चाचणी करण्यात आली आहे.या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मात्र शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांच्यावरती उपचार सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांना येणाऱ्या तापामुळे अॅटीबायोटीक्सचे उपचार सूरू आहे. तसेच सतत येणाऱ्या तापामुळे त्यांना अशक्तपणा येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हळुहळू तब्येत सुधारेल असे देखील ज्युपिटर हॉस्पिटरच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
advertisement
दरम्यान आज महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आता प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार
आजच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये खातेवाटपावर चर्चा होणार आहे. महायुती मंत्रीमंडळाच्या जागावाटपाचा फॅार्म्यूलाही ठरला असून सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला जास्त मंत्रिपदं मिळणार आहेत. भाजपला २३ ते २४ मंत्रीपद तर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासोबत १२ ते १३ मंत्रीपद मिळणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासोबत ९ मंत्रीपद मिळणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदावर भाजपचाच दावा तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. विधानपरिषदेचं सभापतीपद शिवसेनेला देण्याची भाजप महायुतीची तयारी आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन ७ ते ९ मुंबईत तर १६ पासून नागपुरात होणार आहे. याआधीच खातेवाटपासह इतर चर्चा पूर्ण होणार आहेत.
