TRENDING:

Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!

Last Updated:

Eknath Shinde Uddhav Thackeray : मागील दोन दिवसात ठाकरे गटात शिंदेंच्या महत्त्वाच्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे परत येणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

advertisement
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या २६७ नगर परिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना शिंदे गटात अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. निवडणुका, गुन्हे, आरोप-प्रत्यारोप आणि युतीतील वाढता अविश्वास या सर्वांच्या भोवऱ्यात शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा ‘मातोश्री’ची आठवण काढू लागल्याचे संकेत राजकीय वर्तुळांतून मिळत आहेत. त्यामुळे अनेकजण ठाकरे गटात आगामी काळात घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन दिवसात ठाकरे गटात शिंदेंच्या महत्त्वाच्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे परत येणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
- कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता,  मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
- कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
advertisement

राज्याच्या राजकारणात शिंदे गटाची कोंडी, ताणलेली महायुती आणि ‘घरवापसी’च्या हाका, या सर्व घडामोडींनी आगामी महिन्यांतील राजकीय नाट्यमयतेची चाहूल दिली आहे.

गोगावले प्रकरणानं पेटला वाद

महाड नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र, विकास गोगावले आणि राष्ट्रवादी नेत्या स्नेहल जगताप यांच्या समर्थकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्धी कार्यकर्त्याकडे असलेले पिस्तूल काढून पत्रकारांसमोर दाखवल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर नाराज झालेल्या भरत गोगावले यांनी “आमचे मातोश्रीशी संबंध अजूनही कायम आहेत” असे स्पष्ट विधान करत पक्षांतर्गत नाराजीला उघडपणे वाचा फोडली.

advertisement

निलेश राणेंची थेट तक्रार

मालवणचे आमदार निलेश राणेंनी कोकणातील भाजप नेत्यांवर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली. निवडणुकीसाठी आणलेली संशयास्पद रोकड त्यांनी पोलिसांना सुपूर्द केली होती, मात्र उलट गुन्हे त्यांच्या नावावरच दाखल झाल्याचा आरोप त्यांनी केला.दुसऱ्याच दिवशीही त्यांनी आणखी एका वाहनातील रोकड ताब्यात दिली. पण तेथेही रक्कम बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही असा त्यांचा आरोप आहे.

advertisement

बांगर–पाटील यांच्यावरही कारवाई

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधातही अलीकडेच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले किंवा छापे पडले. सलग कारवायांमुळे “टार्गेट आम्हालाच केले जात आहे,” असा सूर शिंदे गटात आहे.

युतीतील समीकरण बिघडतंय?

भाजपकडून ‘शत–प्रतिशत’चा नारा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आक्रमक नेतृत्व, अजित पवार गटाला मिळणारे प्राधान्य, या सर्वांमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत समोर येत आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले. कणकवलीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र लढल्याने नवीन समीकरणांची कुजबुजही सुरू आहे.

advertisement

'मातोश्री'कडे चिमण्या परत फिरणार?

मागील काही दिवसांत शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पावले पुन्हा एकदा 'मातोश्री'च्या दिशेने वळत आहेत. मागील दोन दिवसात मातोश्रीवर शिंदेंच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेन ठाकरे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील जवळपास १०० कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर, नवी मुंबई सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनीदेखील समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.

advertisement

महापालिका निवडणुकांत संघर्ष अधिकच तीव्र?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मार्गशिष महिन्यात देवीच्या नैवद्यासाठी खास, बनवा केळीची पुरी, रेसिपीचा Video
सर्व पहा

नगरपालिका निवडणुकीतील भाजप-शिंदे गटातील संघर्ष हा फक्त ट्रेलर असल्याची भावना अनेकांची आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी राजकीय वर्तुळांत चर्चा सुरू झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल