TRENDING:

निवडणूक होईपर्यंत कुणीही कार्यक्षेत्र सोडायचं नाही, जर जाणार असाल तर... एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

Last Updated:

नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शिवसेनेकडून पक्षातील पदाधिकारी ते शाखा प्रमुख पदापर्यंत कोणीही कार्यक्षेत्र सोडू नये असा आदेश पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. निवडणूक होईपर्यंत मतदार संघातच राहण्याच्या पक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
advertisement

नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. दिवाळी सरताच निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची शक्यता आहे. विधानसभेला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा पुरेपूर प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षन करेल.

जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष अलर्ट मोडवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन, त्यांची मते विचारात घेऊन त्यानुसार निवडणुकीची आखणी करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

जर कार्यक्षेत्राच्या बाहेर जात असाल तर कार्यालयाला कळवणे बंधनकारक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री तथा मुख्यनेते यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून आपणास सुचित करण्यात येते की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व निवडणुका पार पडेपर्यंत आपण आपल्या कार्यक्षेत्रातच राहावे. काही अपरिहार्य कारणास्तव आपणास कार्यक्षेत्राबाहेर जावयाचे असल्यास त्याबाबत मध्यवर्ती कार्यालयास अवगत करावे. तसेच मध्यवर्ती कार्यालयातून आपणास कार्यक्षेत्राबाहेरची जबाबदारी सोपविण्याबाबत सुचित केल्यास, त्या सुचनेचे तंतोतंत पालन करावे, असे शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निवडणूक होईपर्यंत कुणीही कार्यक्षेत्र सोडायचं नाही, जर जाणार असाल तर... एकनाथ शिंदे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल