उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत पतित पावन संघटना आणि शिवसेनेची युती होणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या युतीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुण्यात दोन्ही संघटनांचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनीही उपस्थिती लावली आहे. आजच्या मेळाव्यातून स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका ताकदीने लढण्याचे संकेत दोन्ही संघटनांनी दिले.
advertisement
पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. गत निवडणुकीत भाजपचे सुमारे १०० नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला हादरे देऊन भाजपने सत्ता काबीज केली होती. एकनाथ शिंदे यांची पुण्यात फार ताकद नसली तरी निवडणुकांना ताकदीने सामोरे जाऊन दोन आकडी नगरसेवक निवडून आणण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे करतील. त्यासाठी पतीत पावन संघटना मदत करेल.
