TRENDING:

Eknath Shinde : CA ने बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सासऱ्यानंतर सुनेच्या अंगाला विजयाचा गुलाल!

Last Updated:

Eknath Shinde: नगर परिषदांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पक्षांना यश मिळालं असलं तरी काही मोठे उलटफेर झाले आहेत. या निवडणुकीत आपली छाप सोडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचं गणित एका सूनेनं बिघडवलं.

advertisement
CA ने बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सुनेच्या अंगाला गुलाल लागला
CA ने बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सुनेच्या अंगाला गुलाल लागला
advertisement

मुंबई: राज्यात मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. राज्यातील २८८ नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी पक्षांना यश मिळालं असलं तरी काही मोठे उलटफेर झाले आहेत. या निवडणुकीत आपली छाप सोडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाचं गणित एका सीएनं बिघडवलं.

advertisement

शिवसेना शिंदे गट आणि भाजपने स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवली. शिवसेना शिंदे गट-भाजप युतीत फोडाफोडीचा वाद जो दिल्ली पर्यंत पोहोचला होता त्याची सुरुवात अंबरनाथ येथून झाली होती. वेगवेगळ्या कारणांनी गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. राडा, धमकी, गोळीबार अशा वेगवेगळ्या कारणांनी अंबरनाथची निवडणूक चर्चेत आली होती. याच अंबरनाथ नगरपरिषदेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

advertisement

अंबरनाथमध्ये शिंदे गटाची पकड चांगली असताना देखील त्यांना नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. मात्र, त्यांना नगराध्यक्ष पद राखता आले नाही. शिंदे गटाकडून मनीषा वाळेकर यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जाहीर करण्यात आले. तर भाजपकडून तेजश्री करंजुले-पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

advertisement

>> सीएनं बिघडवलं शिंदे गटाच्या विजयाचं गणित...

भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले-पाटील या चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आहेत. त्यांनी आपल्या प्रचारात शहराच्या विकासाच्या मुद्यासोबतच भ्रष्टाचाराचा मुद्दा अधोरेखित केला होता. वाळेकर हे नाव अंबरनाथ मध्ये रक्तरंजित गुंडगिरी म्हणून कुप्रसिद्ध आहे. तर याचाच फायदा घेत भाजपने चार्टर्ड अकाउंटंट आणि तरुण उमेदवार दिल्याने त्याचा फायदा भाजपला झाला.

advertisement

>> सासऱ्यानंतर सून नगराध्यक्ष... कोण आहेत तेजश्री करंजुले पाटील...

तेजश्री करंजुले-पाटील या व्यवसायाने सीए आहेत. त्याशिवाय, त्यांचे कुटुंब राजकीय पार्श्वभूमी असलेले आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या तेजश्री या भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून आहेत. अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठीची शेवटची थेट निवडणूक २००५ साली झाली होती. त्यावेळी अविभाजित शिवसेनेत असलेल्या गुलाबराव यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता थेट २० वर्षांनी सासऱ्यानंतर सूनेनं नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत बाजी मारली.

इतर संबंधित बातमी:

Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी करत सुरू केला कुक्कुटपालन व्यवसाय, विशालची 3 लाख उलाढाल, कसं मिळवलं यश?
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : CA ने बिघडवलं शिंदेंच्या विजयाचं गणित, 'महाशक्ती' फिकी पडली, सासऱ्यानंतर सुनेच्या अंगाला विजयाचा गुलाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल