गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुख एकमेकांशी भिडल्याची घटना घडली आहे. एका बैठकीनंतर हा संपूर्ण राडा घडला होता. या राड्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
गडचिरोली राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते. यावेळी दादा भुसे यांची सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाप्रमुख आणि असंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख भिडल्याची घटना घडली आहे.
शिवसेना गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणून संदीप ठाकूर तर अहेरी जिल्हाप्रमुख म्हणून राकेश बेलसरे सध्या कार्यरत आहेत. हे दोघेही दादा भूसे यांच्या नेतृत्वाखाली सर्किट हाऊस मध्ये सूरू असलेल्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर दादा भुसे आज चंद्रपूरला रवाना होताच शिंदे गटातील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये राडा झाला. संदीप ठाकूर आणि राकेश बेलसरे हे दोन्ही जिल्हाप्रमुख एकमेंकांच्या अंगावर केले होते. यावेळी दोघांमध्ये भांडण झालं होतं. श्रेय वादावरून दोन्ही जिल्हाप्रमुख भिडल्याची माहिती आहे. दरम्यान यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
बैठकीतील या राड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.