गुलाबराव पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, महायुतीत काहीच बिनसलं नाही आहे. फक्त मुख्यमंत्री दोन दिवस आजारी आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.पण आमची इच्छा आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पाहता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत राहवं, त्यांनी उपमुखमंत्री पद स्वीकारावा असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
advertisement
मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, गृहमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळावं,अशी आम्ही मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या काही खात्यांवर शिवसेनेने दावा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, तसेच त्यांनी (राष्ट्रवादीने) त्यांच्या मंत्री पदाची मागणी केली आहे आणि आमची मागणी एकनाथ शिंदे करत आहेत. तसेच मंगळवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शपथविधी पार पडणाऱ्या आझाद मैदानाची पाहणी केली होती. या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एकही नेता मैदानाच्या पहाणीसाठी उपस्थित नव्हता. यावर काल शिंदे साहेब आजारी असताना आम्हाला इतर गोष्टी महत्वाचे नाही, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टच सांगितल.
तसेच अजितदादा आमच्यामध्ये आले नसते, तर आम्ही 100 जागा जिंकलो असतो,असे खळबळ उडवणारे विधान गुलाबराव पाटील यांनी केले होते. या विधानावर राष्ट्रवादीने आक्षेप घेतल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या विधानावर सारवासारव केली. मी असे म्हंटल की कदाचित ते आले नसते तर आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या, आम्ही जास्त जिंकलो असतो,असे गुलाबराव पाटील म्हणालेत.
