अनिल साबळे, सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.कारण अब्दुल सत्तार यांच्यावर ॲम्बुलन्स घोटाळ्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या आली आहे.त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार व तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांनी संगणमत करून शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. गणेश शं. शंकरपेल्ली यांनी सिल्लोड शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी 2014 ला आपल्या आमदार निधी मधून 2 ॲम्बुलन्स आपल्याच स्वतःच्या व मुलगा अब्दुल समीर यांची प्रगती शैक्षणिक संस्था सोयगावला दिले. यावेळी दोघांनी मिळून शासनाची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी व नियोजन विभाग मंत्रालयाचे उपसचिव यांनी नियम धाब्यावर ठेवून कोणतीही कागदांची पडताळणी न करता अब्दुल सत्तार व त्यांच्या मुलांना आर्थिक लाभ पोहोचला.
2014 आणि 2018 या दोन्ही वर्षी अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी व प्रगती शैक्षणिक संस्था यांना एकूण पाच ॲम्बुलन्स आमदार निधी मधून देण्यात आले आहेत, असा पोलीस तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी संपूर्ण पुराव्यासह सदरील तक्रार/ फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे फिर्यादी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकरणात आता त्यांच्यावर गु्न्हा दाखल होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
