TRENDING:

Eknath Shinde Kalyan News: कल्याणच्या राजकारणात ट्वीस्ट, भाजपच्या दारावरून महत्त्वाचा शिलेदार माघारी खेचला, शिंदेंची स्मार्ट खेळी

Last Updated:

Eknath Shinde Ravindra Chavan : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला. तर, दुसरीकडे शिंदे गटाने भाजपच्या वाटेवर असलेल्या आपल्या नेत्याची घरवापसी करण्यास यश मिळवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या बाजूने पक्ष प्रवेशासाठी दरवाजे खुले केले असून इतर पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात आहे. ठाकरे गटाचा महत्त्वाचा शिलेदार आज भाजपने आपल्याकडे खेचला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी आज भाजपात प्रवेश केला. तर, दुसरीकडे शिंदे गटाने भाजपच्या वाटेवर असलेल्या आपल्या नेत्याची घरवापसी करण्यास यश मिळवले.
कल्याणच्या राजकारणात ट्वीस्ट, भाजपच्या दारावरून महत्त्वाचा शिलेदार  माघारी खेचला, शिंदेंची स्मार्ट खेळी
कल्याणच्या राजकारणात ट्वीस्ट, भाजपच्या दारावरून महत्त्वाचा शिलेदार माघारी खेचला, शिंदेंची स्मार्ट खेळी
advertisement

कल्याण पूर्वच्या राजकारणात मंगळवारी मध्यरात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी शिवसेना (शिंदे गट) नेते महेश गायकवाड यांनी भाजप प्रवेशाची सर्व तयारी झाल्यानंतर ऐनवेळी निर्णय बदलत पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर गायकवाड यांनी हा ‘यू-टर्न’ घेतला.

advertisement

विशेष म्हणजे, शिंदे गटात पुनरागमन होताच महेश गायकवाड यांना कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघांचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रभावात पुन्हा वाढ झाल्याचे मानले जात आहे.

गणपत गायकवाड प्रकरणामुळे बदललं समीकरण...

भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. एका वादातून राडा आणि गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर कल्याणमध्ये गायकवाड विरुद्ध गायकवाड हा राजकीय संघर्ष तीव्र झाला. पोलिसांनी अटक केल्यानंतर गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या भाजपकडून निवडणुकीसाठी उभ्या होत्या. तर, महेश गायकवाड यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या विरोधात बंड करत स्वतंत्र उमेदवारी दाखल केली होती. परिणामी, पक्षाने त्यांची तात्काळ हकालपट्टी केली होती.

advertisement

निवडणुकीनंतर मात्र परिस्थिती बदलली. गायकवाड हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वीच ते सुलभा गायकवाड यांच्या रॅलीतही दिसले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

शिंदे गटाचं डॅमेज कंट्रोल...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

भाजप प्रवेशाच्या आधीच शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो हे लक्षात येताच पक्ष नेतृत्वाने तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले. मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. अखेर, गायकवाड यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेत शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Kalyan News: कल्याणच्या राजकारणात ट्वीस्ट, भाजपच्या दारावरून महत्त्वाचा शिलेदार माघारी खेचला, शिंदेंची स्मार्ट खेळी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल