यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचे संकेत दिले आहेत. पॅसिफिक महासागरात एल निनोचं संकट आहे, जे भारतातील हवामानावर मोठा परिणाम करणार आहे. यंदा पाऊस जास्त होणार नाही त्यामुळे पाण्याचं संकट आणि दुष्काळ दोन्ही जाणवण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या मते, यंदा पावसाचे प्रमाण सरासरीच्या ९४ टक्के राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच ६ टक्क्यांची मोठी तूट यंदा पाहायला मिळू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये जरी परिस्थिती चांगली असली, तरी उत्तरार्धात मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे पेरणीनंतर पिक जगवण्यासाठी शेतकऱ्यासमोर पाण्याचं टेन्शन असेल. पाणीपुरवठा योग्य पद्धतीनं झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे.
advertisement
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस गायब होणार?
यंदा पावसाचे वितरण अत्यंत असमान असेल, हीच सर्वात मोठी चिंतेची बाब आहे
जून: १०१% पाऊस (सुरुवात जोमाने होईल)
जुलै: ९४% पाऊस
ऑगस्ट: ९२% पाऊस
सप्टेंबर: ९०% पाऊस
Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, अवकाळी संकट टळलं, पण हवामान विभागाचा नवा अलर्ट
यंदा पूर्वेकडील राज्ये जसे की बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चांगला पाऊस अपेक्षित आहे. मात्र, देशाचे मध्य, पश्चिम आणि उत्तर भाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा यांसारख्या पावसावर अवलंबून असलेल्या भागांना एल निनोचा फटका बसण्याची भीती आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या काळजात धडधड!
ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने धरणांमधील पाणीसाठ्यासाठी आणि पिकांच्या वाढीसाठी 'लाईफलाईन' मानले जातात. मात्र, नेमक्या याच काळात पावसाने ओढ दिल्यास पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रात मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस कमी होऊ शकतो. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तूट मोठी राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे वितरण विस्कळीत राहू शकते. 'एल निनो'चा प्रभाव जसा वाढेल, तसा मान्सून कमकुवत होत जाईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
