advertisement

नासाचा पराक्रम, आर्टेमिस-2 चा नवा विक्रम; 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं

Last Updated:

Artemis 2: आर्टेमिस-2 मोहिमेतील चार अंतराळवीरांनी पृथ्वीपासून तब्बल 4,06,778 किलोमीटर इतके अंतर पार करत नवा विक्रम रचला आहे .

+
नासाचा

नासाचा पराक्रम! आर्टेमिस-2 चा नवा विक्रम, 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं

पुणे: नासा आपल्या अंतराळ मोहिमांमधून सातत्याने नवे विक्रम रचत असते. आता नासाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 7 एप्रिल 2026 रोजी आर्टेमिस-2 मोहिमेतील चार अंतराळवीरांनी पृथ्वीपासून तब्बल 4,06,778 किलोमीटर (2,52,756 मैल) इतके अंतर पार करत नवा विक्रम रचला आहे. ही मोहीम 54 वर्षांनंतर चंद्राच्या दिशेने जाणारी मानवी अंतराळ मोहीम ठरली असून या मोहिमेविषयी पुणेकर आरुष जोशी याने लोकल18 ला माहिती दिली
आरुष जोशी हा सातत्याने अंतराळात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करतो. अलीकडेच त्याने दोन लघुग्रहांचा शोध लावला होता. आरुषने दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक मोहिमेत चार अंतराळवीर सामील झाले आहेत. यामध्ये रीड वायझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, ख्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सेन यांचा समावेश आहे. ही मोहीम 1 एप्रिल रोजी लाँच झाली होती. 1970 मधील अपोलो (Apollo) 13 मोहिमेचा विक्रम या आर्टेमिस-2 मोहिमेने मोडीत काढला आहे.
advertisement
तब्बल 54 वर्षांचा विक्रम मोडीत..
या कॅप्सूलमध्ये अंतराळवीरांना राहण्यासाठी आणि कामासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. अंतराळात शरीर तंदुरुस्त राहावे यासाठी दररोज साधारण दोन तास व्यायाम केला जातो. हे यान चंद्राजवळ साधारण 6,900 किलोमीटर अंतरावर पोहोचल्यानंतर पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
8 एप्रिलपासून पृथ्वीकडे प्रवास सुरू झाला असून 9 ते 10 एप्रिलदरम्यान कॅप्सूल यानापासून वेगळी होणार आहे. त्यानंतर अंतराळवीर शुक्रवार, 10 एप्रिल रोजी अमेरिकन वेळेनुसार रात्री 8 वाजून 7 मिनिटांनी अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात उतरणार आहेत
advertisement
पृथ्वी-चंद्र एकाच फ्रेममध्ये; अंतराळातून सूर्यग्रहण
या मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना चंद्राच्या मागील बाजूकडून पृथ्वीचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. पृथ्वी आणि चंद्र एकाच फ्रेममध्ये दिसल्याने अंतराळातील दृश्य अधिक स्पष्टपणे पाहता आले. तसेच या प्रवासात अंतराळातून सूर्यग्रहणही पाहायला मिळाले. चंद्र, सूर्य आणि अंतराळयान एका रेषेत आल्यामुळे काही काळासाठी सूर्य चंद्राच्या आड गेला. त्यामुळे सूर्याच्या बाहेरील थराचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
advertisement
दरम्यान, ही मोहीम चंद्रावर उतरण्यासाठी नसून, Orion यानाची चाचणी आणि भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी तयारी म्हणून राबवली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
नासाचा पराक्रम, आर्टेमिस-2 चा नवा विक्रम; 54 वर्षांनी काय घडलं? पुणेकर आरुषने Video तून सांगितलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement