advertisement

Hardik Pandya : गुवाहाटीमध्ये 'हॉर्ट ब्रेक' अन् हार्दिक पांड्याला आणखी एक धक्का; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Hardik Pandya National Flag Insult Inquiry Pune : स्टार क्रिकेट हार्दिक पांड्या विरोधात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. वकील वाजेद खान यांनी ही तक्रार दाखल केली होती.

Hardik Pandya National Flag Insult Inquiry Pune
Hardik Pandya National Flag Insult Inquiry Pune
Hardik Pandya Pune Case : नाद करा पण पुणेकरांचा कुठं! याची प्रचिती वर्ल्ड कप फायनलनंतर सर्वांनाच आली होती. गर्लफ्रेंडला घेऊन मैदानात नाचणाऱ्या हार्दिक पांड्याविरुद्ध पुणेकरांनी आवाज उठवला अन् एकाने तर थेट पोलिसात तक्रारच दाखल केली होती. हार्दिक पांड्याने तिरंग्याचा अपमान केला, असा आरोप करण्यात आला होता. अशातच पुणे पोलिसांनी या तक्रारीवर मोठा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

हार्दिक पांड्या विरोधातील तक्रार अर्ज पुणे पोलिसांनी अहमदाबाद पोलिसाकडे वर्ग केला आहे. स्टार क्रिकेट हार्दिक पांड्या विरोधात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. वकील वाजेद खान यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच पांड्याला आता मोठा दिलासा मिळालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
advertisement

पांड्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केला?

अहमदाबाद येथील स्टेडियममध्ये 8 मार्चला झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यांनतर जल्लोष करताना हार्दिक पांड्या याने त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर प्रकरणात तपास करण्याचा अधिकार हा अहमदाबाद पोलिसांना असल्याचं सांगत अर्ज तिकडे पाठवण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
advertisement

अर्जाची उचित दखल घेण्यात आली

"आपण केलेल्या तक्रारी अर्जाची उचित दखल घेण्यात आली असून, घटनेचे ठिकाण गुजरात राज्यातील अहमदाबाद असल्याने तो पुढील कार्यवाहीसाठी तेथील पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. पुणे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरून हा अर्ज आता निकाली काढण्यात येत आहे.", पुणे पोलिसांनी तक्रारदाराला कळवलं आहे.

गुजरात पोलिसांना हस्तांतरित

advertisement
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु अधिकारक्षेत्रानुसार तो गुजरात येथील पोलिसांना हस्तांतरित करण्यात आला आहे. त्यामुळे पांड्याला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. तर काहींनी पांड्याला दिलासा मिळालाय, असं म्हटलं आहे. त्यामुळे आता पांड्यावर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जातोय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : गुवाहाटीमध्ये 'हॉर्ट ब्रेक' अन् हार्दिक पांड्याला आणखी एक धक्का; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय!
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement