advertisement

Rohit Sharma : बुमराहला 15 वर्षाच्या पोरानं चोपलं अन् हार्दिकच्या कॅप्टन्सीवर भडकला हिटमॅन, काय घडलं?

Last Updated:

Rohit sharma not happy with hardik captaincy : रोहित आणि हार्दिकची बॉन्डिंग चांगली असल्याने बुमराहच्या ओव्हरला चोप पडल्यानंतर रोहितने उघडपणे हात वर करत नाराजी व्यक्त केल्याचा व्हिडीओ समोर आलाय.

Rohit sharma not happy with hardik captaincy
Rohit sharma not happy with hardik captaincy
Rohit sharma Viral Video : आयपीएलचा सर्वात मोठा पीक पाईंट कोणता असेल तर तो गुवाहाटीच्या मैदानात पहायला मिळाला. 15 वर्षाच्या पोरानं म्हणजेच वैभव सूर्यवंशीने जगातील नंबर 1 टी-ट्वेंटी बॉलरला पहिल्याच बॉलवर सिक्स मारला अन् सर्वांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. एकाच ओव्हरमध्ये दोन सिक्स मारून वैभवने आपल्या आंतरराष्ट्रीय आगमासाठी रणशिंग फुंकलं आहे. वैभवने बुमराहच्या दोन्ही ओव्हरमध्ये त्याला चोप दिला. यानंतर रोहित शर्मा चांगलाच भडकल्याचं पहायला मिळालं.

हार्दिकच्या निर्णयांवर रोहित नाराज?

मैदानावर हार्दिक पांड्याकडून होत असलेल्या चुकीच्या कॅप्टन्सीवर रोहित शर्मा पूर्णपणे नाखूष असल्याचं गुवाहाटीच्या मैदानात प्रकर्षानं जाणवलं. हार्दिकच्या काही निर्णयांवर रोहित शर्माने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा विषय ठरला आहे. रोहित आणि हार्दिकची बॉन्डिंग चांगली असल्याने बुमराहच्या ओव्हरला चोप पडल्यानंतर रोहितने उघडपणे हात वर करत नाराजी व्यक्त केल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
advertisement

बुमराहच्या बॉलिंगनुसार फिल्डिंग सेटअप

मैदानात असलेला अनुभवी रोहित शर्मा वारंवार हार्दिकला काही सुचवताना दिसला. मात्र, जिथं चूक होतीये, तिथं रोहित शर्मा माफी देत नाही. तीन ओव्हरमध्ये 50 धावा केल्यानंतर रोहित शर्माने थेट हात वर करत नाराजी व्यक्त केली होती. कारण बुमराहच्या बॉलिंगनुसार फिल्डिंग सेटअप केला गेला नव्हता. अशातच रोहित शर्माला चूक लक्षात आल्याने त्याने हार्दिकला आपलं म्हणणं सांगितलं.
advertisement
advertisement
दरम्यान, वैभव सूर्यवंशी या मॅचमध्ये 278.57 च्या स्टाईक रेटने बॅटिंग केली. त्याने 14 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 39 धावा केल्या. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल याने त्याला मोलाची साथ दिली. यशस्वीने 32 बॉलमध्ये 77 धावांनी वादळी केली, ज्यामध्ये त्याने बुमराहला देखील चांगलाच चोप दिला होता. तर कॅप्टन रियान परागने 10 बॉलमध्ये 20 धावा करत राजस्थानला 150 पर्यंत पोहोचवलं होतं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : बुमराहला 15 वर्षाच्या पोरानं चोपलं अन् हार्दिकच्या कॅप्टन्सीवर भडकला हिटमॅन, काय घडलं?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement