advertisement

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा महत्त्वाचा महामार्ग 2 महिने बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Karad Chiplun Highway: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक विस्कळीत होईल.

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा महत्त्वाचा महामार्ग 2 महिने बंद, कारण काय?
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा महत्त्वाचा महामार्ग 2 महिने बंद, कारण काय?
सातारा: पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरणारा महत्त्वाचा महामार्ग दोन महिने बंद राहणार आहे. पाटण शहरातील बहुचर्चित धांडे पुलाच्या पुनर्बांधणीसह रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातून घाटमाथ्याकडे येणाऱ्या मासळी, फळे, तसेच इतर मालाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कराड-चिपळूण महामार्गावरील पाटणचा धांडे पुलाची पुनर्बांधणी आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम आजपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी दोन महिने बंद राहणार आहे. मंगळवारी ठेकेदार कंपनीकडून ठिकठिकाणी बॅरिकेड्स व सूचना फलक लावण्यात आले.
वाहतूक विस्कळीत होणार
दरम्यान, कराड-चिपळूण मार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दररोज होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक विस्कळीत होईल. तसेच उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.
advertisement
पर्यायी मार्ग
-कराड व उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहने नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथून कराड ते चिपळूण महार्गावरून चिपळूणकडे जातील.
-चिपळूणकडून कराड, उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहने नेरळे गौंड, गव्हाणवाडी फाटा, नवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जातील.
-कराड व उंब्रज बाजूकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून पाचवंड फाटा, उंडाळे, कोकरुड, मलकापूर, आंबा घाट, संगमेश्वरवरून चिपळूणकडे जाईल.
advertisement
-चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक संगमेश्वर, आंबा घाट, मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरून पुढे कराड, उंब्रज कडे जाईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा महत्त्वाचा महामार्ग 2 महिने बंद, कारण काय? पर्यायी मार्ग कोणते?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement