ST Fare Hike : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! या चार महत्त्वाच्या मार्गावरील एसटी तिकीटाच्या दरात मोठी वाढ
Last Updated:
ST Bus Ticket Rate Increase : प्रवाशांनो आता तुम्हीही सुट्टी लागल्यानंतर एसटीने गावी जाणार आहात, तर तिकीटासाठी जास्त पैसे काढून ठेवा. येत्या काही दिवसांत भाडेवाढ होणार आहे. नक्की कोणत्या ठिकाणांसाठी ही भाडेवाढ करण्यात येणार आहे त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई : उन्हाळ्यात लाल परीने गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला आता कात्री लागणारी असल्याची बातमी समोर आली आहे. राज्या मार्ग परिवहन महामंडळाने उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस लक्षात घेता तिकीट दरात तब्बल 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीची नवी भाडेवाढ कधीपासून?
एसटीची ही नवीन दरवाढ 15 एप्रिलपासून लागून होणार असून आता सुट्टीत गावी प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. विशेषतहा आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना 90 ते 100 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल.
का करावी लागली भाडेवाढ?
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुट्टीमध्ये ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. त्यात एसटीचे जाळे महाराष्ट्रातील लहान-लहान खेड्यापाड्यांपर्यंत पसरले आहे त्यामुळे हजारो प्रवासी खाजगी वाहनापेक्षा एसटीलाच पसंती देतात. एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या दिवसात हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार आहे. त्याच नियमाचा वापर करुन महामंडळाने तात्पुरत्या कालावधीसाठी ही दरवाढ जाहीर केलेली आहे.
advertisement
नेमक्या कोणत्या गाड्या महागणार?
ही करण्यात येणारी दरवाढ विशेषतहा साधी बस म्हणजे लाल परी, मिडी बस, जलद देवा आणि रात्रसेवा देणार्या गाड्यांसाठी लागू असेल.महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता प्रौढ प्रवाशांसाठी बसेसच भाडे प्रति टप्पा हा 12 रुपये असेल आणि लहान मुलांसाठी हे भाडे 7 रुपये ठरवण्यात आले आहे.
प्रवासाचे अंदाजे नवे दर असे असतील
1) परळ ते कोल्हापूर - 640 रुपयांऐवजी आता 704
advertisement
2)मुंबई ते कोल्हापूर- 750 रुपयांऐवजी 825
3)मुंबई ते लातूर- 900 रुपयांऐवजी 1000 रुपये
4)मुंबई ते रत्नागिरी- 600 रुपयांऐवडी 700 रुपये
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 9:03 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ST Fare Hike : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! या चार महत्त्वाच्या मार्गावरील एसटी तिकीटाच्या दरात मोठी वाढ







