MI vs RR : फक्त 11 ओव्हरमध्येच मुंबईचा 'गेम ओव्हर', वैभव सूर्यवंशी नाही तर रियान परागने कुणाला दिलं विजयाचं क्रेडिट? पंड्याही शॉक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
RR captain Riyan Parag Statement : यंदाच्या आयपीएल हंगामात सलग 3 विजय मिळवणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं रियान परागने जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचं कौतुक केलं.
Rajasthan royals vs Mumbai indians : गुवाहाटीचा मुसळधार पाऊस अन् ग्राऊंड्समनची मेहनत अशा परिस्थितीतून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात अखेर 11-11 ओव्हरचा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानच्या पुठ्ठ्यांनी मुंबईच्या पलटणचा 27 धावांनी पराभव केल्याने राजस्थान रॉयल्सने यंदाच्या सीझनमध्ये सलग 3 मॅच जिंकून आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली. या यशानंतर बोलताना कॅप्टन रियान परागने टीममधील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यावेळी त्याने टीमच्या खेळाडूंचं कौतुक करत वैभव सूर्यवंशीला नाही तर कुणाला विजयाचं क्रेडिट दिलं? पाहा
जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचं कौतुक
यंदाच्या आयपीएल हंगामात सलग 3 विजय मिळवणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं रियान परागने सांगितलं. टीमच्या बॉलिंगवर बोलताना रियानने जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचं कौतुक केलं. त्यावेळी त्याने राजस्थान रॉयल्सचा प्लॅन देखील समजवून सांगितला. जोफ्राला फक्त वेगाने बॉल टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि तो तसेच करत आहे. 145 ते 150 च्या वेगाने बॉल टाकून त्यावर इतके नियंत्रण ठेवणं ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे, असंही रियान पराग म्हणाला.
advertisement
आयपीएलमधील नंबर 1 ओपनिंग जोडी
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांच्या टॅलेंट आणि मॅचमधील परिस्थितीनुसार खेळण्याच्या पद्धतीमुळे ही जोडी सध्या आयपीएलमधील नंबर 1 ओपनिंग जोडी असल्याचे रियान परागने म्हटले. जयस्वाल गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, तर वैभवने अहमदाबादमधील मॅचमध्ये ज्या पद्धतीने परिस्थितीचा अंदाज घेऊन बॅटिंग केली, ते पाहून मी प्रभावित झालो, असंही रियान पराग यावेळी म्हणाला. सध्यातरी सगळं सुरळीत चाललंय असं वाटतंय, असं म्हणत रियानने टीमवर विश्वास व्यक्त केला.
advertisement
मुंबई इंडियन्सला 11 ओव्हरमध्येच गुडघ्यावर
दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर राजस्थान रॉयल्सची बॉलिंग आणि बॅटिंग चांगलीच आक्रमकता दाखवत आहे. आयपीएलची पर्पल कॅप रवी बिश्वोईकडे असून ऑरेंज कॅप यशस्वी जयस्वालकडे आहे. तर रियान परागच्या स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर राजस्थानने मुंबई इंडियन्सला 11 ओव्हरमध्येच गुडघ्यावर आणलं. मुंबईच्या बॅटर्स राजस्थानच्या बॉलिंगसमोर टिकू शकले नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 7:21 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs RR : फक्त 11 ओव्हरमध्येच मुंबईचा 'गेम ओव्हर', वैभव सूर्यवंशी नाही तर रियान परागने कुणाला दिलं विजयाचं क्रेडिट? पंड्याही शॉक!






