इराण अमेरिकेमध्ये सीजफायर, पण होर्मुझचं काय होणार? जगासाठी खुलं होणार की बंदच राहणार?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या डेडलाईनच्या अगदी काही मिनिटं आधी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांनी सुरू झालेला संघर्ष आता काही काळासाठी थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या डेडलाईनच्या अगदी काही मिनिटं आधी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे युद्धजन्य परिस्थितीत काहीसा दिलासा मिळाला आहे.
ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरून घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवरून माहिती देताना स्पष्ट केले की, "मी इराणवर सुरू असलेली बॉम्बफेक आणि सर्व प्रकारचे लष्करी हल्ले पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे." ट्रम्प यांनी या निर्णयाला एक व्यापक युद्धविरामाच्या दिशेने टाकलेलं पहिलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश
हे युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आलं आहे. ट्रम्प यांनी अधिकृतपणे सांगितलं की, पाकिस्तानच्या नेतृत्वाशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या या मध्यस्थीचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी स्वागत केले असून, यामुळे प्रादेशिक शांततेचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटलं आहे.
advertisement
होर्मूझसाठी ट्रम्प यांची अट
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा युद्धविराम स्वीकारताना एक महत्त्वाची अट घातली आहे. इराणला 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) तात्काळ आणि पूर्णपणे सुरक्षित वाहतुकीसाठी खुली करावी लागेल. ट्रम्प यांच्या मते, "अमेरिका आणि इराण आता ऐतिहासिक शांतता कराराच्या अगदी जवळ आहेत. बहुतेक वादाचे मुद्दे सुटले असून, दोन आठवड्यांचा काळ अंतिम करारासाठी पुरेसा असेल."
Location :
Delhi
First Published :
Apr 08, 2026 7:04 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराण अमेरिकेमध्ये सीजफायर, पण होर्मुझचं काय होणार? जगासाठी खुलं होणार की बंदच राहणार?








