advertisement

Mumbai : पोलीस दलात खळबळ! शिपायानं आयुष्य संपवलं,घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

Shocking News Mumbai : मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यातील शिपाई किशोर म्हस्के यांनी घाटकोपर येथील राहत्या घरी धक्कादायक निर्णय घेतला आहे. पोलीस वसाहतीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आझाद मैदान पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक निर्णय
आझाद मैदान पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचा धक्कादायक निर्णय
मुंबई : सर्वांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातून एक अत्यंत दु:खत बातमी समोर येत आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या एका पोलीस शिपायाने स्वत:चे आयुष्य संपवले आहे. मृत पोलील कर्मचाऱ्याचे नवा किशोर म्हस्के असे असून त्यांनी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर म्हस्के हे घाटकोपर शहरातील पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सरकारी पोलीस वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास होते. मात्र मंगळवारी त्यांनी घरातच टोकाचे पाऊल उचलल्याचे उघडकीस आले. नंतर या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस शिपायाच्या मृत्यूचे गूढ वाढले
सध्या घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. मात्र किशोर म्हस्के यांनी इतका मोठा निर्णय का घेतला किंवा त्यांच्या आत्महत्येमागील कौटुंबिक वाद का कामाचा ताण की अन्य काही कारण आहे आहे का या सर्वांचा पोलीस तपास करत आहे. या घटनेत पोलिसांनना कोणतहीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय असेल ते अद्याप समजले नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : पोलीस दलात खळबळ! शिपायानं आयुष्य संपवलं,घरात कुणीही नसताना उचललं टोकाचं पाऊल
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement