TRENDING:

मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वेळापत्रकात बदल

Last Updated:

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून मतदार यादीचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  राज्यात सध्या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पुढील काही दिवसांत महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. त्याआधी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. आता त्यावर हरकती व सूचना किंवा तक्रारी मागविण्यात आल्या आहेत. पण हे करताना आयोगाने सातत्याने मतचोरीचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून पुन्हा नवी अपडेट समोर येत आहे.
News18
News18
advertisement

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून मतदार यादीचा नवीन कार्यक्रम कळवला आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर ही हरकती घेण्याची अंतिम तारीख होती, ती आता वाढवण्यात आली आहे.यानुसार आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारयाद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्त स्तरावर केले आहे. याबाबत काही हरकती व सूचना किंवा तक्रारी असतील तर निवडणूक आयोगाने सुधारणा करत पुन्हा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. आता 3 डिसेंबरपर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.

advertisement

आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरता 1 जुलै हा अधिसूचित दिनांक निश्चित केली आहे. त्यादिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदारयाद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत.

काय आहे सुधारित कार्यक्रम?

  • प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 3 डिसेंबर 2025 पर्यंत
  • advertisement

  • प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग न्याय अंतिम मतदार याद्या आधीप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक १० डिसेंबर 2025
  • मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे 15 डिसेंबर 2025
  • मतदान केंद्रानिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे 22 डिसेंबर 2025

दरम्यान, विरोधकांकडून मतदारयाद्यांमधील घोळावरून सातत्याने मतचोरीचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत कथित घोळ दूर करण्याची मागणी केली होती. यापार्श्वभूमीवर महानगरपालिकांसाठी प्रारूप यादी प्रसिध्द झाल्यानंतर आयोगाने हरकती व सूचना किंवा तक्रारी पाठविण्याचे आवाहन करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ही मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांना दिलेल्या यूजर आयडी आणि पासवर्डच्या सहाय्याने संबंधित प्राधिकरणांना आयोगाच्या वेबसाईटवरून विधानसभेच्या मतदार याद्या डाऊनलोड करता येणार आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वेळापत्रकात बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल