कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत MMRDA तर्फे गवार कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांच्याकडून कल्याण शिळ रोडवर पत्रीपुल रूणवाल चौक दरम्यान मेट्रो १२ ( कल्याण- तळोजा ) प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू असून दिनांक ११/०८/२०२५ रोजीपासून ते दि. २०/०८/२०२५ रोजी पीलर नं.१७७ ते १७९ मानपाडा चौक ते सोनारपाडा चौक दरम्यान दिनांक २१/०८/२०२५ रोजीपासून ते २८/०८/२०२५ रोजी पीलर नं.११३ ते ११७ आणि २७/०८/२०२५ रोजीपासून ते दिनांक ३१/०८/२०२५ रोजी पीलर नं.१२३ ते १२५ सुयोग रिजन्सी अनंतम ते व्यंकटेशन पेट्रोल पंप दरम्यान सिमेंट कॉक्रीट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. सदर कालावधीत परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
advertisement
कुठे रस्ता राहणार बंद?
त्यामुळे वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ) (ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ११/०८/२०२५ रोजी ते दिनांक २०/०८/२०२५ रोजी कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मानपाडा चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
सदरची वाहने मानपाडा चौक येथुन सर्व्हिस रोडने जावून पुढे सोनारपाडा चौक येथून पुन्हा सततच्या वाहिनीवरुन पुढे इच्छीत स्थळी जातील. दिनांक २१/०८/२०२५ रोजी ते दिनांक ३१/०८/२०२५ रोजी कल्याण शिळरोडवरून शिळ फाटयाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सुयोग रिजन्सी अनंतम चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
वाहनं सुयोग रिजन्यी अनंतम चौक पीलर नं.११० येथून उजवीकडे वळण घेवून कल्याणकडे येणाऱ्या वाहिनीवरुन पीलर नं.१२८ व्यंकटेशन पेट्रोल पंप समोरुन डावीकडे वळण घेवुन सततच्या वाहीनीवरुन पुढे इच्छितस्थळी जातील.
कल्याण शिळरोडवरून कल्याणकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डि.एन.एस.चौक इथं 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.
सदरची वाहने डि.एन.एस. चौक पीलर नं. १४४ येथुन सर्व्हिस रोडने जावुन पुढे सुयोग हॉटेल अनंतम चौक येथुन पुन्हा कल्याण रोडवरुन पुढे इच्छितस्थळी जातील.
ही अधिसुचना दिनांक ११/०८/२०२५ रोजीपासून ते दिनांक २०/०८/२०२५ रोजी तसंच दिनांक २१/०८/२०२५ रोजीपासून ते दिनांक ३१/०८/२०२५ रोजी दरम्यान रात्री ११:४५ वाजता ते सकाळी ०५:०० वाजेपर्यंत अंमलात राहील. सदर वाहतूक अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.
दरम्यान, मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी पोलीस आयुक्तांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आहे. सध्या डोंबिवली आणि कल्याण-शिळ रोड परिसरात भीषण ट्रॅफिककोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान गर्डर बसवण्याचे काम आणि डायव्हर्शन सुरू केल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर बनेल. गणपती उत्सव हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. कृपया डोंबिवलीकरांच्या भावना आणि सोयीचा विचार करून हे काम उत्सव संपल्यानंतर हाती घ्यावे. ही जनतेची एकमुखाने केलेली जनहिताची मागणी आहे, अशी मागणी पाटील यांनी केली.