TRENDING:

आई-बापाला दारू प्यायची सवय, नशेत लेकीसोबत किळसवाणे कृत्य, छ.संभाजीनगर हादरलं

Last Updated:

मुलीचे आई-वडील हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, आई कचरा बॉटल जमा करून घर चालवते, मात्र मुलीच्या आई-वडिलांना दोघांनाही दारू पिण्याची सवय आहे,

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

छत्रपती संभाजीनगर: बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. एका 8 वर्षाच्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची संतापजनक घटना वाळूज परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या अंगावर चटक्याचे वण आढळून आले त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी या नराधम बापाचा ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत ही   संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील एका चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलीच्या आरडाओरडीनंतर हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. मुलीचा जोरात रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने घराकडे धाव घेतली.

advertisement

मुलीच्या अंगावर ८ ते १० चटक्याचे व्रण

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. तिच्या पाठीवर, हातावर आणि पायांवर चटक्यांचे ८ ते १० वण दिसून आले. हा अत्याचार गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय शेजाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीला सुरक्षित ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. संबंधित सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सकाळी हा नराधम फरार झाला होता.

advertisement

त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि दुपारी या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेजारील महिलांनी मुलीच्या आईवरही आरोपीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीवरील या अमानुष प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

दारूच्या नशेत मुलीसोबत नको ते कृत्य

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

मुलीचे आई-वडील हे रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात, आई कचरा बॉटल जमा करून घर चालवते, मात्र मुलीच्या आई-वडिलांना दोघांनाही दारू पिण्याची सवय आहे, त्यामुळे मुलांकडे लक्ष नाही. आई बाहेर मजुरीसाठी गेली असताना वडिलांनी दारू पिऊन मुलीचे कपडे काढून मुलीला जवळ घेतलं. पोटाची आणि गुप्तांगाची पप्पी घेतली. मुलीच्या हे सगळं लक्षात आलं त्यावेळेस ती घरातून बाहेर पळत गेली आणि शेजारच्यांना सांगितलं. शेजारी महिलांनी तिच्या आईला सर्व प्रकार सांगितल्यानंतर, मुलीच्या आईने तक्रार दिली. त्यानुसार, आम्ही पॉक्सो नुसार, गुन्हा दाखल करून आरोपी वडिलाला ताब्यात घेतलं, अशी माहिती वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई-बापाला दारू प्यायची सवय, नशेत लेकीसोबत किळसवाणे कृत्य, छ.संभाजीनगर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल