TRENDING:

Latur: लालपरीला वाचावण्याचा प्रयत्न केला पण माणूस जीवाशी गेला, निलंगा एसटी डेपोमधला प्रत्येक जण रडला; हृदयद्रावक घटना

Last Updated:

अचानक डिझेलचा भडका उडाल्यामुळे काही क्षणात एस टी बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यावेळी डिझेल भरत असलेले एस.टी. महामंडळाचे ऑपरेटर बसवराज मठपती हे या आगीत गंभीररीत्या भाजले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शशीकांत पाटील, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

लातूर : ग्रामीण भागात गावागावात पोहोचलेली लालपरी हा गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे लालपरीचा प्रत्येक काम करणारा माणूस हा गावकऱ्यांसाठी घरच्या माणसासारखाच असतो, अशाातच लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ​लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये अचानक एसटी बसला आग लागली होती. आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असताना ऑपरेटर कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली . या घटनेमुळे लातूर एस.टी. महामंडळात शोककळा पसरली आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरातील एस.टी. बस डेपोमध्ये १२ मार्च रोजी ही घटना घडली होती.  बसवराज मठपती असं मृत ऑपरेट यांचं नाव आहे. नेहमी प्रमाणे एसटी बस ही रात्री डेपोमध्ये दाखल झाली.  रात्री ०८ च्या सुमारास निलंगा आगारातील एस.टी. बसमध्ये डिझेल भरत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाला. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली.

advertisement

अचानक डिझेलचा भडका उडाल्यामुळे काही क्षणात एस टी बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. यावेळी डिझेल भरत असलेले एस.टी. महामंडळाचे ऑपरेटर बसवराज मठपती हे या आगीत गंभीररीत्या भाजले होते. घटनेनंतर त्यांना तात्काळ निलंगा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

आगीचे कारण अस्पष्ट

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॅाटेल, मेस बंद, पण पुण्यात इथं विद्यार्थ्यांसाठी मोफत दिलं जातंय जेवण, Video
सर्व पहा

दरम्यान, आग इतकी भीषण होती की, सुमारे अर्धा तास परिसरात धुमसत राहिली. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी डिझेल भरत असताना अचानक भडका उडाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. बसवराज मठपती यांच्या निधनामुळे एसटी महामंडळाच्या कामगारांवर शोककळा पसरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Latur: लालपरीला वाचावण्याचा प्रयत्न केला पण माणूस जीवाशी गेला, निलंगा एसटी डेपोमधला प्रत्येक जण रडला; हृदयद्रावक घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल