ठाणे जिल्ह्यातील राजकीय वॉर काही थांबायचं नाव घेत नाही. वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत हे शाब्दीक युद्ध रंगलं आहे. खरं तर पालिका निवडणुकीनंतर त्यावर पडदा पडण्याची चिन्ह असतानाच पुन्हा एकदा वादाचा भडका उडाला आहे. गणेश नाईक यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा राज्याचं नगरविकास खातं आलंय. गणेश नाईकांनी नवी मुंबईतील भूखंडाचा मुद्दा उपस्थित केला. नगरविकास खात्यातील लोकांनी नवी मुंबईतील काही भूखंड बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला आहे आणि यावरूनचं नाईकांनी एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement
गणेश नाईकांनी शिंदेंच्या नगरविकास खात्याला टार्गेट केल्यानंतर शिवसेनेनं गणेश नाईकांना जशास तस्स उत्तर दिलं आहे. महायुतीतल्या या वादात ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय राऊतांनी उडी घेत नाईकांना भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्तेत एकत्र असतानाही या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.
