अहिल्यानगर : जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे दोन आमदार असतानाही गुंडगिरी आटोक्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान कुविख्यात गुंड म्हणून ओळख असलेल्या पैलवान सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
advertisement
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जामखेड परिसरात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सागर मोहळकर याच्यावर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी तातडीने परिसर नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे.
निलेश घायवाळ आणि सागर मोहोळकर कनेक्शन काय?
सागर मोहोळकर याची प्रकृती अत्यंत नाजूक असून याच सागर मोहोळकरने कुख्यात गुंड निलेश गव्हाळ यांच्या मारली होते. त्यानंतर सागर मोहोळकर हा चर्चेमध्ये आला होता त्याच्या विरोधात सागर मोहोळकर यांचे वडील याने दोन दिवसापूर्वी जामखेड पूर्णा मध्ये गुन्हा दाखल केला होता
गुन्हेगारीचा वाढता आलेख
जामखेड तालुक्यात मागील काही महिन्यांपासून मारामाऱ्या, खंडणी, धमक्या आणि गटांतील वादांच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याने त्यांचे मनोबल वाढत असून कायद्याचा धाक उरलेला नाही.
राजकीय आश्रयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत
तालुक्यात दोन आमदारांचे प्रतिनिधित्व असतानाही गुन्हेगारीवर नियंत्रण का येत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण मिळत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. गोळीबारामागील कारण वैयक्तिक वैर, गँगवॉर की इतर काही, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
