advertisement

APMC Market: आले, शेवग्याला उठाव, लिंबूनंही खाल्ला भाव, राज्यात कुठं मिळाला सर्वाधिक दर?

Last Updated:

APMC Market: महाराष्ट्रातील कृषी बाजारात बुधवारी मोठी उलाढाल झाली. आले, लिंबू आणि शेवग्याच्या दरांबाबत जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: आले, शेवग्याला उठाव, लिंबूनंही खाल्ला भाव, राज्यात कुठं मिळाला सर्वाधिक दर?

मुंबई: महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज मोठ्या प्रमाणात कृषी मालाची आवक आणि विक्री होत असते. बुधवारी, 4 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये विविध प्रकारचा कृषी माल दाखल झाला. त्यातील आले, लिंबू आणि शेवगा यांची झालेली आवक आणि त्याला मिळालेला बाजारभाव याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2474 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 761 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास 2500 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 66 क्विंटल आल्यास 5500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये आज 601 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 454 क्विंटल लिंबूस 2000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल लिंबूस 11000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्यास उठाव 
आज राज्याच्या मार्केटमध्ये 566 क्विंटल शेवग्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 288 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास 4000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 9 क्विंटल शेवग्यास 7000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: आले, शेवग्याला उठाव, लिंबूनंही खाल्ला भाव, राज्यात कुठं मिळाला सर्वाधिक दर?
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement