advertisement

Weather Alert: महाराष्ट्र आता तापणार, आग ओकणारं संकट; 3 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात होळीनंतर मोठे बदल जाणवत आहेत. 3 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
1/7
होळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. तापमानाचा पारा चांगला चढला असून काही ठिकाणी तापमान 38 अंशांच्या वर गेले आहे. तर 5 मार्च रोजी कोकणतील पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण आणि आद्र हवामान राहणार असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण ते विदर्भ गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकणात वारं फिरल्याचं चित्र असून हवामान मुख्यत्वे कोरडं, उष्ण आणि उष्ण-आद्र जाणवत आहे. उत्तर कोकणचा पारा चांगलाच चढला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना उष्ण-आद्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईत देखील कमाल तापमान 37 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आद्रता जास्त असल्याने अस्वस्थता जाणवेल. गुरुवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही.

3/7
मध्य महाराष्ट्रात कोरडे आणि उष्ण हवामान राहील. पुण्यासह सोलापूर कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत कमाल तापमानाचा पारा 34-37 अंशांवर राहील. तर किमान तापमान 20-23 अंशांवर राहील. गुरुवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा अंदाज नाही. तापमान सामान्यापेक्षा जास्त राहील.

4/7
मराठवाड्यात देखील कोरडे आणि उष्ण हवामान राहील. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि नांदेड परिसरात तापमानात मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमान 35 ते 38 अंशावर जाण्याची शक्यता असून किमान तापमान 20-24 अंशांवर राहील. 5 मार्चला कोणताही विशेष अलर्ट नाही, पण उन्हाची तीव्रता वाढणार आहे.

5/7
विदर्भात कोरडे, उष्ण हवामान राहील आणि कमाल तापमानात मोठी वाढ होईल. नागपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि आसपासच्या भागात कमाल तापमान 38-39 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. तर किमान तापमान 20-24 अंश सेल्सिअस राहील.

6/7
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात मार्च ते मे महिन्यांच्य दरम्यान सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर मार्च महिन्यातील 2-3 दिवस पारा चाळीशी पार करण्याचा अंदाज आहे. 5 मार्चला कोणताही अलर्ट नसला तरी वाढतं तापमान हैराण करण्याची शक्यता आहे.

7/7
दरम्यान, राज्यात पुढील 3-4 दिवसांत कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढू शकते. त्यानंतर तापमान काहीसे स्थिर राहील. कोकणात आर्द्रतेमुळे घाम येणे, थकवा जाणवू शकतो. तर विदर्भात वाढत्या उन्हाच्या झळांचा धोका जाणवेल. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे आणि आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement