advertisement

Science : घाम आणि अश्रू खारट का असतात? हे कसं शक्य.... यामागचं कारण समजलं तर बसेल धक्का

Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का, की निसर्गाने आपल्या शरीरातून निघणाऱ्या पाण्याला खारट चव का दिली आहे? माणसाच्या शरीरात साखर असते, मग हे पाणी गोड का नसतं?
1/8
उन्हाळ्यात कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब कधीतरी चुकून जिभेला लागला असेल किंवा दु:खाच्या भरात गालावरून ओघळलेलं आसू ओठांपर्यंत पोहोचलं असेल, तर एक गोष्ट आपल्या सर्वांच्याच लक्षात येते... ती म्हणजे या दोन्हीची चव 'खारट' असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की निसर्गाने आपल्या शरीरातून निघणाऱ्या पाण्याला खारट चव का दिली आहे? माणसाच्या शरीरात साखर असते, मग हे पाणी गोड का नसतं?

2/8
हे केवळ योगायोग नाही, तर मानवी शरीराच्या अद्भुत कार्यप्रणालीचा आणि संतुलनाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. घाम आणि अश्रूंच्या खारटपणामागे लपलेलं विज्ञानाचं कोडं आज आपण उलगडणार आहोत.

3/8
आपल्या घामात आणि आसवात असणाऱ्या या खारटपणाचे मुख्य कारण म्हणजे 'सोडियम क्लोराईड', ज्याला आपण साध्या भाषेत 'मीठ' म्हणतो. केवळ मीठच नाही, तर यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात. हे घटक रक्ताभिसरण आणि शरीरातील पेशींच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. हे सर्व क्षार आपल्या रक्तप्रवाहात विरघळलेले असतात आणि जेव्हा शरीर द्रव बाहेर टाकतं, तेव्हा हे क्षार नैसर्गिकरित्या त्यात मिसळतात.

4/8
डोळ्यांतील पाणी: केवळ भावना नव्हे, तर 'सुरक्षा कवच'आपले अश्रू हे 98% पाण्याने बनलेले असतात. पण उरलेल्या 2% भागामध्ये मीठ, प्रथिने आणि तेलाचा अंश असतो.
अश्रूंमध्ये असणारे मीठ हे डोळ्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत करते.
मिठाचे हे प्रमाण डोळ्यांची ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी आवश्यक असते. म्हणूनच रडल्यानंतर डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते.
डोळ्यांतील पाणी: केवळ भावना नव्हे, तर 'सुरक्षा कवच' आपले अश्रू हे 98% पाण्याने बनलेले असतात. पण उरलेल्या 2% भागामध्ये मीठ, प्रथिने आणि तेलाचा अंश असतो. अश्रूंमध्ये असणारे मीठ हे डोळ्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत करते. मिठाचे हे प्रमाण डोळ्यांची ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि डोळ्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी आवश्यक असते. म्हणूनच रडल्यानंतर डोळ्यांची जळजळ कमी होण्यास मदत होते.
advertisement
5/8
घाम: शरीराची 'नॅचरल कूलिंग सिस्टीम'जेव्हा आपल्याला गरम होतं किंवा आपण शारीरिक कष्ट करतो, तेव्हा घामाच्या ग्रंथी रक्तातील पाणी आणि मीठ खेचून घेतात आणि त्वचेवाटे बाहेर टाकतात. जेव्हा हा घाम हवेमुळे सुकतो किंवा त्याचं बाष्पीभवन होतं, तेव्हा आपलं शरीर थंड होतं. घामातील पाणी हवेत उडून जातं, पण त्यातील मीठ त्वचेवरच शिल्लक राहतं. म्हणूनच जास्त घाम आल्यानंतर कपड्यांवर पांढरट डाग दिसतात.

6/8
शरीरात हे मीठ येतं कुठून?मानवी शरीर स्वतःहून मीठ तयार करू शकत नाही. आपण जे रोजचं अन्न खातो आणि पाणी पितो, त्यातूनच हे मीठ शरीरात जातं. एकदा शरीरात गेलं की ते इलेक्ट्रोलाइट्समध्ये रूपांतरित होतं. एका निरोगी मानवी शरीरात साधारण 225 ग्रॅम मीठ असते. हे मीठ स्नायूंच्या आकुंचनासाठी आणि मज्जासंस्थेच्या सिग्नलसाठी (Nerve Signals) इंधनाचे काम करते.

7/8
शरीराचा स्मार्ट फिल्टरशरीरातील मिठाचे प्रमाण वाढलं तर काय होतं? इथेच आपली किडनी (मूत्रपिंड) हिरो ठरते. शरीराला नको असलेलं जास्तीचं मीठ किडनी फिल्टर करून लघवीवाटे बाहेर टाकते. या प्रक्रियेत घाम आणि अश्रू देखील काही प्रमाणात मदत करतात. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी स्थिर राहते आणि आपलं शरीर निरोगी राहतं.

8/8
थोडक्यात काय तर, घाम आणि अश्रूंची खारट चव ही आपल्या शरीराची 'बॅलन्स शीट' आहे. ही चव आपल्याला आठवण करून देते की आपलं शरीर आतून किती जटिल आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करत आहे

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement