Aayesha Khan: पीरियड्स दरम्यान अभिनेत्रीने शूट केलेलं 'धुरंधर'चं गाणं, खुलासा करुन झाली ट्रोल; म्हणाली, 'लाज वाटत नाही...'
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Ayesha Khan Dhurandhar Movie : डिसेंबर 2025 मध्ये रिलीज झालेल्या आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. 1300 कोटींची कमाई करत चित्रपटाने बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडित काढले. लवकरच या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातले कलाकारही सध्या चर्चेत आले आहेत. रणबीर सिंग, अक्षय खन्नासह अनेक सेलिब्रिटी प्रकाशझोतात आले. आता अशातच चित्रपटातल्या आयटम साँगवर परफॉर्म केलेल्या अभिनेत्रीने शु़टिंग दरम्यान काही धक्कादायक खुलासा केला आहे.
आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंधर' चित्रपटातील गाण्यांची सोशल मीडियावर कमालीची क्रेझ आहे. 'शरारत' गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या सुपरहिट गाण्यात आयेशा खान आणि क्रिस्टल डिसूझाची जोडी आहे. जसलीन स्कँडल आणि मधुवनती बागची यांनी गायलेलं हे गाणे सोशल मीडियावर कमालीचं ट्रेंडिंगला आहे. अभिनेत्री आयेशा खानने एका मुलाखतीमध्ये गाण्याच्या शुटिंगवर भाष्य केलं आहे.
advertisement
आयेशा खान म्हणालीये की, मी हे गाणं जेव्हा मला मासिक पाळी आली होती. त्या कठीण काळातच अभिनेत्रीने हे गाणं शूट केल्याचा खुलासा केला. अभिनेत्री आयशा खानला 'धुरंधर' चित्रपटातील 'शरारत' या आयटम साँगने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. 'शरारत' गाण्याने आतापर्यंत 100 मिलियनचा व्ह्यूजचा टप्पा गाठला. हे गाणे प्रचंड हिट ठरले आहे. आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझाच्या डान्सिंग मुव्ह्जला सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद मिळाला.
advertisement
आयशाने मुलाखतीत सांगितले की, "मी 'शरारत' गाण्याची दोन दिवसांमध्ये शुटिंग केली आहे. त्याच दिवसांमध्ये मला मासिक पाळी आली होती. त्यामुळे मला माझं शरीर जाड वाटत होतं. त्यामुळे मी माझ्या कामात झोकून देत नाही, असं मला वाटत होतं. कारण मासिक पाळीच्या वेळी तब्येत बरी नसते. पण दोन दिवस खूप काम होते. आम्हाला खूप कामं करायचे होते. अजिबात वेळ नव्हता. इतकं नाचल्यानंतर माझं शरीर दुखत होते. मासिक पाळी आल्यामुळे मी खूप भावनिक सुद्धा होते. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि रडू लागले."
advertisement
अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर तिला फार ट्रोल करण्यात आले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली की, "माझी मासिक पाळी सर्वांसाठी एक हसू झालं आहे. प्रत्येक गोष्टीवर हसणं म्हणजे, मस्ती नाहीये. कदाचित मला ते कळलं नाही, कारण ते माझ्यासाठी खूप सामान्य आहे. महिला प्रत्येक महिन्याला या गोष्टीतून जाते. मासिक पाळी दरम्यान महिलावर्ग खूप गोष्टी करतो, परंतु हे दुर्दैवी आहे."
advertisement
अभिनेत्री पुढे म्हणाली की, " खरोखरंच समस्त पुरूष वर्गाला सुशिक्षित करण्याची खूप गरज आहे. मला माहितीये की, अनेक पुरूषांनीच माझ्या मासिक पाळीवर विनोद केले होते. ही गोष्ट फार वाईट आहे. परंतू, मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मी जे काही केले त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ते उपाय केल्याशिवाय राहुच शकला नसता."
advertisement
advertisement






