advertisement

Mumbai Airport: इम्रानच्या तस्करी सीरिजसारखी मुंबईत विमानतळावर घटना, बॅगा उघडल्यावर दृश्य पाहून अधिकारी हादरले, PHOTOS

Last Updated:
अलीकडे नेटफ्लिक्सवर अभिनेता इम्रान हाशमीची तस्कर नावाची सीरिज आली होती. मुंबई विमानतळावर कशा प्रकारे तस्करी केली जाते, यावर ही सीरिज आधारीत आहे, आता मुंबई विमानतळावर या सीरिजमधील एका सीनसारखीच घटना समोर आली आहे. (विजय वंजारा, प्रतिनिधी)
1/11
अलीकडे नेटफ्लिक्सवर अभिनेता इम्रान हाशमीची तस्कर नावाची सीरिज आली होती. भारतात सर्वाधिक पाहिली जाणारी तस्कर सीरिज ठरली आहे. मुंबई विमानतळावर कशा प्रकारे तस्करी केली जाते, यावर ही सीरिज आधारीत आहे, आता मुंबई विमानतळावर या सीरिजमधील एका सीनसारखीच घटना समोर आली आहे. तब्बल हिरे, दागिने आणि 44 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत तब्बल ४४ कोटी असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंतही ही एक मोठी कारवाई समजली जात आहे. 

2/11
मुंबई विमानतळावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.  २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या कालावधीत मुंबई कस्टम झोन –III अंतर्गत विमानतळ सीमाशुल्क आयुक्तालय अर्थात Airport Commissionerateच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे.

3/11
मुंबई विमानतळावर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये अंमली पदार्थ आणि परकीय चलनासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

4/11
स्पॉट आणि APIS प्रोफाइलिंगच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात एकूण ८ हायड्रोपोनिक गांजाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. बँकॉकहून मुंबईत आलेल्या ९ प्रवाशांकडून सुमारे ४४.२९२ किलो संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे.

5/11
आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या गांजाची अंदाजे किंमत तब्बल ४४.२९२ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.  बँकाकडून आलेल्या या प्रवाशांना अंमली पदार्थ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

6/11
याशिवाय २९९ ग्रॅम वजनाचे ‘मेथाक्वालोन’ असल्याचा संशय असलेलं अमली पदार्थही जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ७४ लाख ७५ हजार रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय,

7/11
तर विमानतळावर आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५ प्रकरणांमध्ये एकूण ३२ लाख ८५ हजार ६६८ रुपयांचे परकीय आणि भारतीय चलनासह ४५५ कॅरेट नैसर्गिक आणि लॅब-ग्रोवन हिरे जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत सुमारे ९४ लाख ९७ हजार ३०० रुपये आहे. 

8/11
तर २१ कॅरेट सोन्याचे तुटलेले दागिने  जे १६०.७९० ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत  २१ लाख ५१ हजार ४७३ रुपये आहे.

9/11
तसंच १२०३.६९ कॅरेट कापलेले आणि पॉलिश केलेले नैसर्गिक पाचू, माणिक, निळम, अॅमेथिस्ट, प्रॅसिओलाइट आणि इतर मौल्यवान हिरे सुद्धा जप्त केले आहे. ज्याची किंमत १५ लाख १६ हजार १२७ रुपये आहे. हा सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

10/11
या कारवाईमध्ये परदेशी चलन आणि भारतीय चलनही या प्रवाशांकडून जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये डॉलरचा समावेश आहे.

11/11
सर्व प्रकरणांमध्ये संबंधित प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असून कस्टम्स विभागाने अमली पदार्थ आणि तस्करीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement