advertisement

मुंबईत वडापाव विक्रेत्यांना लुटणारा 'बडा साहेब' निघाला भामटा! BMC चा दणका अन् उतरली 'लायसन्स'ची मस्ती

Last Updated:

दुकानाची पाहणी करण्याचे नाटक करत त्याने मालकाला दम भरला की तुमच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.

News18
News18
मुंबई:   मुंबईची शान असलेल्या वडापाव विक्रेत्यांना लक्ष्य करून पालिकेचा तोतया अधिकारी बनून पैसे उकळणाऱ्या एका 62 वर्षीय वृद्धाचा पर्दाफाश झाला आहे. स्वतःला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आरोग्य विभागातील 'फूड सेफ्टी ऑफिसर' असल्याचे सांगत विक्रोळी परिसरातील छोट्या विक्रेत्यांकडून खंडणी वसूल करणाऱ्या विजय गणपत गावडे याला विक्रोळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा घाटकोपर पश्चिम येथील रहिवासी असून त्याच्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 मध्ये आरोपी विजय गावडे विक्रोळी पूर्व येथील 'गुप्ता वडापाव' या दुकानात गेला होता. तिथे त्याने आपली ओळख पालिकेचा बडा अधिकारी अशी करून दिली. दुकानाची पाहणी करण्याचे नाटक करत त्याने मालकाला दम भरला की, तुमच्याकडे 'फायर सेफ्टी' आणि 'फूड लायसन्स' नाही त्यामुळे तुमच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते. ही कारवाई टाळायची असेल तर पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. त्यावेळी घाबरलेल्या दुकानदाराने तडजोड करून आरोपीला 800 रुपये दिले होते.
advertisement

पुन्हा वसुलीसाठी आला अन् फसला 

एका ठिकाणाहून पैसे मिळाल्यावर आरोपीची हिंमत वाढली. त्याने परिसरातील इतर वडापाव विक्रेत्यांनाही अशाच प्रकारे धाक दाखवून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा तो गुप्ता वडापाव दुकानात पैशांची मागणी करण्यासाठी आला असता, दुकानदाराला त्याच्या वागण्यावर संशय आला. दुकानदाराने सतर्कता दाखवत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. विक्रोळी पोलिसांनी सापळा रचून या तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
advertisement

पोलिसांचा तपास सुरू

विक्रोळी पोलिसांनी आरोपी विजय गावडे याच्यावर फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात त्याने इतरही अनेक फेरीवाल्यांना लुबाडल्याचे समोर येत आहे. पालिकेकडून अशा प्रकारे रोख रक्कमेची मागणी कोणताही अधिकारी वैयक्तिकरीत्या करत नाही. जर कोणी संशयास्पद व्यक्ती पालिकेचे नाव सांगून पैसे मागत असेल, तर तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत वडापाव विक्रेत्यांना लुटणारा 'बडा साहेब' निघाला भामटा! BMC चा दणका अन् उतरली 'लायसन्स'ची मस्ती
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement