advertisement

MS Dhoni : कॅप्टन कूल धोनीचा ताबा सुटला, पोलिसांच्या सापळ्यात अडकला, रांचीच्या रस्त्यावर थरार!

Last Updated:

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी धोनीचं चर्चेत यायचं कारण त्याची मैदानावरची कामगिरी नाही, तर वाहतूक नियमांचं उल्लंघन आहे.

कॅप्टन कूल धोनीचा ताबा सुटला, पोलिसांच्या सापळ्यात अडकला, रांचीच्या रस्त्यावर थरार!
कॅप्टन कूल धोनीचा ताबा सुटला, पोलिसांच्या सापळ्यात अडकला, रांचीच्या रस्त्यावर थरार!
रांची : टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी धोनीचं चर्चेत यायचं कारण त्याची मैदानावरची कामगिरी नाही, तर वाहतूक नियमांचं उल्लंघन आहे. रांचीमधील वाहतूक पोलिसांनी एमएस धोनीला ओव्हरस्पीडमध्ये कार चालवल्यामुळे दंड ठोठावला आहे. रांची शहरातील कांके परिसरात ही घटना घडली आहे. वाहतूक देखरेख करणाऱ्या कॅमेऱ्यांनी धोनीच्या आलिशान कारने वेगमर्यादा ओलांडल्याचे रेकॉर्ड केले. त्यानंतर, मोटार वाहन कायद्यांतर्गत चलन जारी करण्यात आले.

धोनीला कितीचा दंड?

वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल धोनीला एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ई-चलन प्रणाली अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ज्या वाहनासाठी चलन जारी करण्यात आले आहे ती काळी मर्सिडीज कार आहे. या संदर्भात धोनी किंवा त्याच्या प्रतिनिधींनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

धोनीच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान कार

सर्व नागरिकांना वाहतुकीचा समान नियम लागू आहे, अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे. धोनी त्याच्या मूळ गावी रांचीमध्ये अनेकदा आलिशान कार आणि बाईक चालवताना दिसतो. धोनीच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान वाहने आहेत. यामध्ये जीप, ग्रँड चेरोकी, ट्रॅकहॉक, मर्सिडीज-बेंझ जी 63 एएमजी आणि निसान जोंगा यासारख्या गाड्या आणि अनेक सुपरबाईक्सचा समावेश आहे.
advertisement

धोनीला कारणे दाखवा नोटीस

गेल्या आठवड्यात, झारखंड राज्य गृहनिर्माण मंडळाने रांची येथील निवासी भूखंडाच्या कथित व्यावसायिक वापराबद्दल धोनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मंडळाने त्याला 15 दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, हरमू गृहनिर्माण कॉलनीमधील HIG-10/A हा भूखंड केवळ निवासी उद्देशांसाठी देण्यात आला होता, पण अलिकडच्या माहितीनुसार या जागेतून पॅथॉलॉजी लॅब चालवली जात आहे.
advertisement

धोनीची आयपीएल तयारी

दरम्यान एमएस धोनीने आयपीएल 2026 च्या तयारीला सुरूवात केली आहे. 28 किंवा 29 मार्चपासून आयपीएल 2026 ला सुरूवात होणार आहे, त्याआधी धोनी सीएसकेच्या जर्सीमध्ये नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडिओही समोर आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MS Dhoni : कॅप्टन कूल धोनीचा ताबा सुटला, पोलिसांच्या सापळ्यात अडकला, रांचीच्या रस्त्यावर थरार!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement