TRENDING:

Jalna Rain Update: मुसळधार पाऊस, घाणेवाडी जलाशय तुडुंब, ओव्हरफ्लो झाल्यास जालन्यात पुराची भीती

Last Updated:

Jalna Rain Update: नवीन जालना शहराला घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा पुरवठा केला जातो. घाणेवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ते तुडुंब भरलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घाणेवाडी धरण तुडुंब भरले असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. असं असलं तरी, धरण ओव्हरफ्लो झाल्यास पुंडलिका नदीला पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
advertisement

संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. घनसावंगी, अंबड, परतुर, मंठा, जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या आठही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.

Monsoon Tips : पूरजन्य संकटात अडकलात? घाबरू नका, या सोप्या गोष्टी करा फॉलो

advertisement

जालना शहराला संत गाडगेबाबा जलाशयात तसेच नाथ सागर येथून पाणीपुरवठा केला जातो. नवीन जालना शहराला घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा पुरवठा केला जातो. घाणेवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने ते तुडुंब भरलं आहे. धरणात 17 फुटांपर्यंत पाणी जमा झालं आहे. पाणी पातळी 18 फुटांवर आल्यास धरण ओव्हरफ्लो होईल. यामुळे जालना शहरातून वाहणाऱ्या पुंडलिका नदीला पूर येण्याची शक्यता आहे.

advertisement

View More

नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. घाणेवाडी जलाशयातून जालना शहराला कोणत्याही प्रकारची वीज न वापरता पाणीपुरवठा केला जातो. यामुळे प्रशासनाची वीज बचत देखील होते. हे धरण तुडुंब भरल्याने किमान जालना शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला, असं म्हटलं जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

दरम्यान, सध्या मुंबई, कोकणच आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसामुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. विदर्भातही अति मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. अनेक रस्त्यांना नदीचं रुप आलं असून लोकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna Rain Update: मुसळधार पाऊस, घाणेवाडी जलाशय तुडुंब, ओव्हरफ्लो झाल्यास जालन्यात पुराची भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल