Pune Crime: पुण्यात अल्पवयीन मुलाचं कांड; ससूनमध्ये 16 वर्षीय मुलीच्या प्रसूतीनंतर मोठा खुलासा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलाने १६ वर्षांच्या मुलीला प्रेमाचं आमिष दाखवलं
पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये अत्याचारानंतर पीडित मुली गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खडक आणि विमानतळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करण्यात आले. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलाने १६ वर्षांच्या मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. नुकतीच तिची ससून रुग्णालयात प्रसूती झाली, त्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उजेडात आला. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
advertisement
सोशल मीडियावरून ओळख आणि विवाहाचे आमिष
दुसऱ्या घटनेत, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून खान नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. आरोपीने पीडितेशी जवळीक साधून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणातील पीडितादेखील गर्भवती राहिली असून तिची नुकतीच प्रसूती झाली आहे. याप्रकरणी तरुणीने स्वतः फिर्याद दिल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
advertisement
पुणे शहरात अल्पवयीन मुला-मुलींमधील अशा प्रकारच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात असून, पोलीस या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यात अल्पवयीन मुलाचं कांड; ससूनमध्ये 16 वर्षीय मुलीच्या प्रसूतीनंतर मोठा खुलासा











