नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री सावंत हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुलीला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांना गुरुवारी दुपारी छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने त्यांची अँजिओग्राफी केली असता, हृदयात एक 'ब्लॉक' आढळला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वीरित्या पार पाडली.
advertisement
विशेष म्हणजे, १९ मार्च हा दिवस डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. २०१९ मध्ये याच दिवशी मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. काल त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला ७ वर्षे पूर्ण झाली. या वर्धापनदिनाच्या दिवशीच त्यांच्यावर शस्त्रक्रियेची वेळ आल्याने समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डिस्चार्ज देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
