TRENDING:

गोंदिया हादरलं! चक्क पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच रुग्णवाहिका चालकाचा गळफास; तेलंगणातील 'शिवा'ने का संपवलं आयुष्य?

Last Updated:

पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रवी सपाटे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

गोंदिया:   गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात तेलंगणा राज्यातील एका रुग्णवाहिका चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. शिवा असे या चालकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवा हा खाजगी रुग्णवाहिकेतून तेलंगणा राज्यातून एक मृतदेह घेऊन नातेवाईकांसह त्यांच्या गावी जात होता. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आल्यानंतर चालक शिवाने मद्यप्राशन केल्यामुळे मृताच्या नातेवाईकांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी डूग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत टाकून पुढील प्रवासासाठी रवाना केला.  तर मूळ रुग्णवाहिका आणि चालक शिवा यांना चौकशीसाठी डूग्गीपार पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले.

advertisement

नेमकं काय झालं?

दरम्यान, आज सकाळी पोलीस स्टेशनच्या पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या एका पिकअप वाहनाच्या मागील बाजूस दोरीच्या साहाय्याने शिवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

advertisement

पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठी खळबळ 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर जर्मनीत, लवकरच होतोय खास सोहळा, तुम्हालाही वाटेल अभिमान
सर्व पहा

पोलिसांनी वाहन अडविल्यामुळे व झालेल्या कारवाईच्या तणावातून शिवाने आत्महत्या केली की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाचा तपास गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सर्व बाबींची बारकाईने चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. तपासाअंती आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गोंदिया हादरलं! चक्क पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्येच रुग्णवाहिका चालकाचा गळफास; तेलंगणातील 'शिवा'ने का संपवलं आयुष्य?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल