TRENDING:

‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर आता जर्मनीत, लवकरच होतोय खास सोहळा, तुम्हालाही वाटेल अभिमान! Video

Last Updated:

Dnyanoba Tukaram: जर्मनीतील ख्रिसचेम येथील विठ्ठलधाम मंदिरात लवकरच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गौरव सातासमुद्रापार होणार आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी जगाला भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आता त्यांच्या याच विचाराचा ठसा जगभर उमटत आहे. जर्मनीतील ख्रिसचेम येथील विठ्ठलधाम मंदिरात लवकरच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. हा सोहळा अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असेल.
advertisement

जर्मनीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे वारकरी परंपरेचा गजर सातासमुद्रापार ऐकू येणार आहे. तसेच, परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. याबाबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी माहिती लोकल18 सोबत बोलताना दिली आहे.

अर्जुनाचा तो बाण अन् बाणेरचा उगम! पुण्यातील पांडवकालीन बाणेश्वर मंदिराचा रंजक इतिहास

डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले की, 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जर्मनीतील विठ्ठलधाम मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

advertisement

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या 450 व्या वैकुंठगमन सोहळा यांचे औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संतांच्या विचारांचा, त्यांच्या साहित्याचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

सातासमुद्रापार दुमदुमणार ज्ञानोबा-तुकाराम गजर 

आळंदी देवस्थान संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची सुमारे 2 फूट उंचीची मूर्ती मकराना येथील पांढऱ्या संगमरवरी दगडातून साकारण्यात आली आहे. ही मूर्ती जैन श्वेतांबर मूर्तिकला केंद्र येथे तयार करण्यात आली. 10 फेब्रुवारीला ही मूर्ती राजस्थानहून जर्मनीकडे पाठविण्यात आली आहे. देहू देवस्थान संस्थान यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांची अडीच फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी विजया एकादशीच्या दिवशी देहू येथील मुख्य मंदिरात विधीपूर्वक पूजा करून ही मूर्ती जर्मनीकडे रवाना करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता हार्वेस्टरचे व्हा मालक! शेतकऱ्यांना 35 लाखांचे मिळतंय अनुदान,कुठे कराल अर्ज?
सर्व पहा

दरम्यान, जर्मनीतील ख्रिसचेम येथील श्री विठ्ठलधाम मंदिराला लाखो नागरिक भेट देत असतात. त्यामुळे याठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची स्थापना झाल्यानंतर परदेशी नागरिकांनाही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर आता जर्मनीत, लवकरच होतोय खास सोहळा, तुम्हालाही वाटेल अभिमान! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल