मृतक अंश हा काल दुपारी आपल्या मित्रासोबत हलबीटोला शमशानघाट परिसरात असलेल्या डोहात आंघोळीसाठी गेला होता. याच पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंशच्या घरच्या लोकांनी अंश बेपत्ता असल्याची तक्रार गोरेगाव पोलिसात काल रात्री दिली होती.
पोलिसांनी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांना विचारपूस केल्यानंतर सदर प्रकार पुढे आला. आज दिनांक 22 एप्रिल रोजी मंगळवारी हलबीटोला शमशान घाट येथील खोल पाण्यातून अंशचे प्रेत गोताखोराच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी घेतली आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
April 22, 2025 5:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला, डोहाच्या पाण्यामध्ये बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
