समोर आलेली घटना गोंदियातील कोहमारा हायवे मधील मुर्दोली परिसरामध्ये घडली. रात्री 10,10:30 च्या दरम्यान creta कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला. उपचारा करिता नागपूरला हलवताना वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.
लिफ्टमध्ये अडकले मायलेक, मग डिलिव्हरी बॉयने केलं असं काही की 1 कोटी लोकांनी पाहिला हा VIDEO
पुढील postmortem आणि procedure नागपूर गोरेवाडा येथे होणार आहे. मुर्दोली परिसरात नेहमी वाघांचे आवागमन होते, सदर परिसरात हायवे मुळे नेहमी वन्य प्राणी मृत्यू मुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघ पण जावू शकतात याची आधीच शक्यता वर्तवली होती. सदर रोड नागझिरा - नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो आहे. तिथे आता लवकर उपाय योजना करण्याची गरज आहे.
advertisement
दरम्यान, रस्त्यावर अचानक गाडीसमोर आलेल्या प्राण्यांना दुखापत होते किंवा अशा धडकेत त्यांचा जीवही जातो. वाघ हा नागझिरा तील T14 वाघिणीचा 2 वर्षाचा निम्नवयस्क बछडा होता. या घटनेता व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये वाघ जखमी झालेला दिसत आहे. तो कसाबसा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतो. जबर बसलेल्या धडकेमुळे वाघाला खूप दुखापत झाल्याचंही दिसत आहे. दुर्देवानं या धडकेत झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाला.
