लिफ्टमध्ये अडकले मायलेक, मग डिलिव्हरी बॉयने केलं असं काही की 1 कोटी लोकांनी पाहिला हा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे. ज्या गोष्टींना अधिक परिश्रम करावे लागायचे ते आता कमी झाले आहेत. तंत्रज्ञान जेवढं कामी येत आहे, त्याचा जेवढा फायदा आहे तेवढेच त्याचे दुष्परिणामही पहायला मिळतात.
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोयीस्कर झाले आहे. ज्या गोष्टींना अधिक परिश्रम करावे लागायचे ते आता कमी झाले आहेत. तंत्रज्ञान जेवढं कामी येत आहे, त्याचा जेवढा फायदा आहे तेवढेच त्याचे दुष्परिणामही पहायला मिळतात. कधी तांत्रिक बिघाड होतो तर कधी अचानक अपघात घडतात. त्यामुळे अनेकांच्या मनात भितीही निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून लिफ्टमधील अनेक अपघात समोर आलेल आहेत. आता लिफ्टमधील आणखी एक व्हिडीओ समोर आला असून लिफ्टमधील लोक थोडक्यात बचावले.
एक महिला तिचं बाळ आणि डिलिव्हरी बॉय लिफ्टने चालले असतात. अचानक लिफ्टचा काहीतरी तांत्रिक बिघाड होतो आणि लिफ्ट कोसळायला लागते. डिलिव्हरी बॉयच्या सतर्कतेमुळे सर्वाचे प्राण वाचतात. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडिओच्या सुरुवातीला लिफ्टमध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि महिला तिच्या लहानग्या बाळासोबत दिसत आहे. अचानक असं काही घडतं की लिफ्ट बंद पडते. त्यामुळे आई आणि मूल खूप घाबरतात, पण डिलिव्हरी बॉय धाडस दाखवतो आणि दार उघडेपर्यंत आई आणि मुलाची काळजी घेतो. दरवाडा उघडताच तो आई आणि मुलाला पहिल्यांदा बाहेर पाठवतो आणि मग स्वतः बाहेर पडतो. डिलिव्हरी बॉयचे धाडस पाहून लोक त्याचं कौतुक करत आहेत.
advertisement
advertisement
Good News Movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक अनेक कमेंट करत डिलिव्हरी बॉयचं कौतुक करत आहेत. व्हिडीओ कमी वेळात खूप व्हायरल झाला असून व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंटही आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 11, 2023 11:23 AM IST
मराठी बातम्या/Viral/
लिफ्टमध्ये अडकले मायलेक, मग डिलिव्हरी बॉयने केलं असं काही की 1 कोटी लोकांनी पाहिला हा VIDEO






