Video: शिंगांनी उचलून फेकलं, पायांनी तुडवलं; गायीचा मुलीवर जीवघेणा हल्ला
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्राणी आणि जनावरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या मनात भिती बसली असून हे प्राणी, जनावरे कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही.
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : प्राणी आणि जनावरांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांच्या मनात भिती बसली असून हे प्राणी, जनावरे कधी कोणावर हल्ला करतील सांगू शकत नाही. एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका गायीने मुलीवर जीवघेणा हल्ला केला. वारंवार शिंगाने उचलून आपटून पायाने तिला जखमी केलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ खळबळ उडवत आहे.
व्हिडिओमध्ये 9 वर्षांची मुलगी तिची आई आणि पाच वर्षांच्या भावासोबत शाळेतून परतताना दिसत आहे. त्यांच्या बाजुने गायी आणि वासरु चालत आहे. अचानक गाई मागे फिरते आणि 9 वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला करते. तिला शिंगावर उचलून खाली आपटते. शिंगाने पायाने चिमुलीवर भयानक हल्ला करते. मुलीच्या आईच्या किंचाळण्यानं आजूबाजूचे लोक जमा होतात आणि गायीला तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत गाय मुलीवर सतत हल्ला करत असते.
advertisement
गायीला पळवून लावण्याचा स्थानिक लोक प्रयत्न करतात. अथक प्रयत्नानंतर त्यांना गायीला हाकलण्यात यश येतं. मुलीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यातं येतं. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर आणि पुढील तपासानंतर गाईच्या 26 वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे.
advertisement
ही घटना तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या एमएमडीए कॉलनीतून समोर आली आहे. घराबाहेरील लावलेल्या सीसीटीव्हा कॅमेऱ्यामध्ये हा भयावह प्रकार कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Cows attack harmless little girl in MMDA, #Chennai. @chennaicorp Cows roaming on the streets are a big menace and a threat to motorists and walkers. Please take action against the cow owner! #Cow #CowAttack@CMOTamilnadu @UpdatesChennai pic.twitter.com/wdV5LD0iyw
— Ajay AJ (@AjayTweets07) August 10, 2023
advertisement
चेन्नई कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य सचिव आयुक्त, जे राधाकृष्णन यांनी मुलीची खाजगी रुग्णालयात भेट घेतली. राधाकृष्णन यांनी सांगितलं की, गायीच्या मालकाला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बाळावर हल्ला करणाऱ्या गायीला आणि तिच्या वासराला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पेरांबूर येथील गोठ्यात ठेवलं आहे. गायीला कोणताही संसर्गजन्य रोग झाला आहे की नाही आणि हा हल्ला कोणत्या रोगामुळे झाला आहे का, याची खातरजमा केली जाईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 11, 2023 10:41 AM IST


