TRENDING:

गुंतवणूकदारांना लुबाडलं, अश्लील Video काढून महिलांना धमकावलं, खरातसारखंच IRS अधिकाऱ्याचं कांड, पडळकरांचा गंभीर आरोप

Last Updated:

९ ते १८ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले, यातूनच २००० हजार कोटींचा घोटाळा आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी केल्याचे पडळकर म्हणाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईतील घरांच्या स्वप्नांवर पाणी फेरणारा तब्बल 2000 कोटींच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DDSR कंपनीच्या नावाखाली सुमारे 20 प्रकल्प राबवत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. 9 ते 18 महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे, असेही पडळकरांचं म्हणंणं आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत..
गोपीचंद पडळकर-आयआरएस सचिन मोटे
गोपीचंद पडळकर-आयआरएस सचिन मोटे
advertisement

पडळकर म्हणाले, मुंबईमध्ये घर असावे असे प्रत्येक कष्टकऱ्याला वाटते. जुन्या मुंबईत शक्य नाही म्हणून नवी मुंबईत लोक प्रयत्न करतात. व्याजाने पैसे उचलून बँक कर्जाने घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करतात. एक आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी नातेवाईकांच्या नावाने डीडीएसआर कंपनीच्या नावे २० प्रकल्प सुरू केले. आमदार व खासदारांसाठी इमारत ते तयार करत आहेत. आमदार व खासदार आमच्या खिशात असल्याचे ते सांगत आहेत, यामाध्यमातून त्यांनी २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप पडळकरांनी केला.

advertisement

पैसा दुप्पट करून देतो असं सांगितलं अन्....

कलाकार आणि पत्रकार यांचीही एक सोसायटी ते तयार करत आहेत. वेगवेगळ्या इमारतीचे प्लॉट त्यांनी घेतले आहेत. गुंतवणूकदारांची यादी आहे. त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले. ९ ते १८ महिन्यात पैसे दुप्पट करून देतो असो सांगून पैसे घेतले. प्लॉट घेऊन त्यांनी सोसायटी निर्माण केली. काही लोकांच्या नावाने त्यांनी सोसायटी निर्माण करत सरकारची फसवणूक केली. २०२० रोजी बुकिंग घ्यायला सुरुवात केली पण त्याचा ताबा सोडा आता भूमिपूजन केले जात आहे. ही लोकांची फसवणूक आहे. सीसी नसताना बांधकाम केले जात आहे. सिडकोचे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत, हा फ्रॉड आहे. १.९७ कोटींचा दंड काही प्रकल्पांवर आहे. दंड असताना काम कसे करू शकतात. आमच्या गावाकडचे लोक आहेत, त्यांनी पैसे भरले आहेत. त्यांचे पैसे अडकले आहे. आयआरएस असल्याने लोकांना धमकी दिली जात आहे. चार मजल्यांची सीसी मिळाली तरीही वरच्या मजल्यांचे काम सुरू केले आहे. यावर्षी पझेशन देणार होते, ते आतातरी शक्य दिसत नाही, असे पडळकर म्हणाले.

advertisement

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

उत्खनन केले पण रॉयल्टी भरली नाही, याबाबत महसूल मंत्री यांना मी भेटून तक्रार केली आहे. जीएसटी भरलेली नाही, तरीही कारवाई झालेली नाही. मातोश्री आमदार आणि खासदारांची बिल्डिंग चार वर्षांपूर्वी बांधायला घेतली पण चार वर्षे झाली तरी अद्याप काम झालेले नाही. ते रतन टाटाचा फोटो वापरत आहेत, सचिन मोटेंवर कारवाई करायला हवी. अशोक खरात प्रमाणे सचिन मोटे यांची फाईल समोर येईल, जे गुंतवणूकदार आहेत त्यांचे महिलांसोबतचे व्हिडिओ तयार केले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जॉइंट सीपी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे पडळकर यांनी सांगितले.

advertisement

आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांचेही पैसे अडकले

हजारो कोटी रुपये ब्लॅकचे व्हाईट करून दिले आहेत. हवालाचे पैसे याठिकाणी वापरले जात आहे. लोकांनी कर्ज काढले आहेत, त्यांचे हप्ते सुरू आहे. इमारतीचे बांधकाम सुरू नाही मग हफ्ते कसले घेतात? बँकाचे दोषी अधिकारी आहेत, काही आयपीएस आणि आयआरएस अधिकारी यांचेही पैसे अडकले आहेत

अश्लील व्हिडीओ काढून महिलांना धमकावलं जातंय

advertisement

तो निलंबित होईल, अशी प्रकरण आणि त्याची काळी कृत्य पुढच्या आठवड्यात समोर येईल. तुम्ही अशोक खरातला विसराल. काही मुली मला भेटून गेल्या आहेत. त्या घाबरलेल्या आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

लवकरच ते कांड बाहेर येतील, अश्लील व्हिडीओ काढून त्यांना धमकावलं जात आहे, असा धक्कादायक गौप्यस्फोटही त्यांनी केला.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुंतवणूकदारांना लुबाडलं, अश्लील Video काढून महिलांना धमकावलं, खरातसारखंच IRS अधिकाऱ्याचं कांड, पडळकरांचा गंभीर आरोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल