छत्रपती संभाजीनगर शहरातील 11 निवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या रुग्णसेवा मंडळाची स्थापना केलेली आहे. 2018 साली या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये जे एक सदस्य आहेत, सुरेश देशमुख, हे एकदा रेल्वेने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना काही लोक त्या ठिकाणी भेटले. त्यांनी सांगितले की आम्ही एक संस्था चालवतो. त्याच्यानंतर त्यांना त्यांची कल्पना आवडली आणि एक दिवस त्यांनी त्यांचे पूर्ण संस्थेचे कामकाज बघितलं. त्यानंतर ते संभाजीनगर शहरामध्ये आले. त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांना सांगितले की अशी एक संस्था आहे, ते अशा पद्धतीने रुग्णांसाठी काम करतात, तर आपण देखील तसं काहीतरी करूयात.
advertisement
त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना ही संकल्पना खूप आवडली आणि त्यांनी याची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त चाळीस हजार रुपये जमा झाले होते. त्याच्यातून त्यांनी प्रत्येक दोन-दोन वस्तू घेतल्या. त्यामध्ये वॉकर असेल, रुग्णांसाठी जो स्पेशल बेड असतो तो बेड, त्यासोबतच ऑक्सिजन सिलेंडर अशा दोन-दोन वस्तू घेऊन सुरुवात केली आणि सहा महिने आपण हा उपक्रम करून बघण्यात चालला तर पुढे कंटिन्यू करू, असं त्यांनी ठरवलं होतं. त्याच्यानंतर सहा महिन्यात त्यांचा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे चालला. लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि आज त्यांचा हा उपक्रम चालू आहे.
कोरोना काळामध्ये देखील त्यांनी खूप गरजू रुग्णांना मदत केली. सध्याला त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात बेड्स आहेत, ऑक्सिजन सिलेंडर आहे, वॉकर आहे, सर्व गोष्टी आहेत आणि अशा पद्धतीने त्यांची ही संस्था काम करते.





