नागपूरमधील सुरेश भट सभागृहात खेळावर आधारित करिअर या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी करत सरकारी यंत्रणेवर आसुड उगारला.
'माझी खूप इच्छा आहे की नागपूरमध्ये खेळण्यासाठी ३०० स्टेडियम तयार करावे. पण ४ वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर लक्षात आलं की सरकार जे आहे ते अत्यंत कामचुकार असतात. महापालिका, एनआयटी यांच्या विश्वासावर कोणतं काम होणार नाही. चालत्या गाडीचं चाक पंक्चर करण्याचा अनुभव यांच्याकडे आहे' अशी टीका नितीन गडकरींनी केली.
advertisement
'राजकारणात फुकट्या लोकांचा बाजार'
तसंच, 'एक व्यक्ती दुबईहून आली. त्याने मला सांगितलं की, स्पोर्ट स्टेडिअम चालवलो. मी विचारलं कसं चालवतो. मी विचार केला, १५ वर्षांसाठी कंत्राट काढणार, लाईट आम्ही लावणार, कपडे बदलण्याची व्यवस्था करून देणार आणि लॉनची मॅनजेमेंट ती व्यक्ती बघेल. परिसरानुसार स्पोर्ट खेळवले जातील. जे तरुण खेळायला येतील, त्यांच्याकडून कमीत कमी फी घेईल. मुळात कुणाला फुकट दिलं नाही पाहिजे. मी तर राजकारणात आहे, इथं तर फुकट्या लोकांचा बाजार असतो. प्रत्येक गोष्ट फुकट लागत असते, पण मी फुकट काही देणार नाही' असा टोलाही नितीन गडकरींनी राजकारण्यांना लगावला.
'सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे कायमच नाही'
'सत्ता, संपत्ती आणि सौंदर्य हे कायमच नाही हे क्षणभंगुर आहे, माणसाला यशाची नशा लागली की, तो विचार करणं बंद करतो कमी लोक आहेत. अमिताभ बच्चन सारखे ज्यांना सक्सेस 80 व्या वर्षांत देखील तितकंच मिळत आहे, इथे लोक रोज पत्ते बदलत आहे. चांगले दिवस असतात तेव्हा 75 ते 80 वर्षांपर्यंत कसं चांगलं जगता येईल याचा विचार करायला पाहिजे. तुमच्या तोंडावर कौतुक करणारे खूप असतात. पण तुम्ही तेव्हा पदावरून पायउतार होतात, ग्लॅमर संपून जातं तेव्हा कुणीही विचारायला येत नाही. जर याचा विचार करायचा असेल तर करिअर चांगलं केलं पाहिजे. मी काही सल्ला देणार तज्ञ नाही किंवा अर्थ तज्ज्ञ नाही. पण मी फायनाशील एक्स्पर्ट आहे आणि ५ लाख कोटींची काम विना पैशांची करतो. त्याामुळे मला माहिती आहे, ते नेमकं कसं मिळवायचं' असा सल्लाही गडकरींनी उपस्थितींना दिला.